स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

धगधगत्या उन्हाळ्यातही भाविकांना स्वामी दर्शनासह लाभणार गारव्याचे समाधानश्री.वटवृक्ष मंदिर परिसरात बसविण्यात आले १२ फुटी लांबीचे हाय व्हॅल्यूम फॅन

धगधगत्या उन्हाळ्यातही भाविकांना स्वामी दर्शनासह लाभणार गारव्याचे समाधान

HTML img Tag Simply Easy Learning    

धगधगत्या उन्हाळ्यातही भाविकांना स्वामी दर्शनासह लाभणार गारव्याचे समाधान

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री.वटवृक्ष मंदिर परिसरात बसविण्यात आले १२ फुटी लांबीचे हाय व्हॅल्यूम फॅन

HTML img Tag Simply Easy Learning    

आता थंडीचे दिवस संपून नुकतेच उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळा सर्व परिचित आहे.या पार्श्वभूमीवर श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना उन्हातून आल्यानंतर उकाड्याचा त्रास होऊ नये याकरिता पुण्यातील इको एअरकॉन कंपनीचे एच.व्ही.एस.एल मॉडेल असलेले तब्बल १२ फुट लांबी व ५ इंच रुंदी पाते असलेले २ भले मोठे फॅन मंदिरातील शेजघर समोरील परिसरात बसविण्यात आले आहेत. याबद्दल अधिक माहिती देताना मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी गतवर्षी नुकतेच मंदिर परिसर नुतनीकरण केल्यानंतर मंदिर परिसरात अनेक ठिकाणी वातानुकूलित यंत्र बसविण्यात आले आहेत. गतवर्षी उन्हाळ्यात उन्हातून अनेक भाविकांनी मंदिरात स्वामी दर्शनाकरिता आल्यानंतर मंदिरातील वातानुकूलित परिसरामुळे आलेल्या गारव्याच्या सुखद अनुभवानी समाधान व्यक्त केले व करीत आहेत. आता नुकतेच शेजघर समोरील परिसरात भले मोठे फॅन बसविल्याने येणाऱ्या उन्हाळ्यात या फॅनच्या हवेमुळे मंदिरातील व मंदिर परिसरातील गारव्याचा समतोल राखला जाऊन येणाऱ्या उन्हाळ्यात स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी या मंदिरातील महत्त्वाच्या प्रमुख उत्सव काळात स्वामी दर्शनाकरिता आलेल्या भाविकांना नक्कीच समाधान लाभेल असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, रवीराव महिंद्रकर, आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – वटवृक्ष मंदिर परिसरात १२ फूट लांबीचे हाय व्हॅल्यूम फॅन बसविलेले छायाचित्रात दिसत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button