स्वामींच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटच्या नावलौकिकात भर – आ.प्रसाद लाड
स्वामींच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटच्या नावलौकिकात भर - आ.प्रसाद लाड
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230217-WA0030.jpg)
स्वामींच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटच्या नावलौकिकात भर – आ.प्रसाद लाड
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
निवासी श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अक्कलकोट नगरी ही स्वामींची कर्मभूमी आणि पुण्यभूमी आहे. वटवृक्ष मंदिरात याची प्रचिती भाविकांना आजही येते. स्वामी समर्थांच्या या प्रचितीमुळे स्वामी भक्तांची दिवसेंदिवस वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाकरिता भाविकांचा उत्साह दिसून येत आहे.
त्यामुळे स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोटच्या नावलौकिकात भरच पडले असल्याचे भावोद्गार विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच सहकुटुंब येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार प्रसाद लाड व कुटुंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी लाड बोलत होते. यावेळी
नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,नागेश कुंभार, तालुका अध्यश मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, ऋषीकेश लोणारी, सरपंच प्रदीप पाटील, दयानंद बमनाली, नन्नू कोरबू, संजय राठोड, राहुल वाडे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – आमदार प्रसाद लाड व कुटुंबीयांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)