*हटगार कोष्टी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार-प्रा. डॉ. ज्योती वाघमारे*
*आद्य जगद्गुरु देवदासमय्य सभा मंडप कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न*

*आद्य जगद्गुरु देवदासमय्य सभा मंडप कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न*

*हटगार कोष्टी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार-प्रा. डॉ. ज्योती वाघमारे*


सोलापूर -एमआयडीसी परिसरातील आशा नगर येथील श्री आद्य जगद्गुरु देवदासमय्या हटगार कोष्टी समाज सामाजिक संस्थेच्या सभा मंडप कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ.ज्योती वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून रुपये दहा लाख खर्चित सभा मंडप भूमिपूजन सोहळा बागलकोट निलनकेरी येथील सिद्धारूढ मठाचे मठाधिपती श्रो.ब.ब्र.श्री गनलिंग महास्वामीजी,मुदनुर आणि सस्तापुर मठाचे मठाधिपती डॉ.श्री ईश्वरानंद आप्पाजी,प.पु.ष.ब्र.श्री. अभिनव रेवनसिद्ध पट्टदेवर गुरुहिरे मठ, मैंदर्गी,मी.नि.प्र. मृत्युंजय महास्वामीजी, सिद्धाश्रम मैंदर्गी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन साठे,श्री सद्गुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठ नीलम नगर अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी, श्री सिद्धारूढ मठ विनायक नगर अध्यक्ष महादेव जुळजुळे, श्री चौडेश्वरी मंदिर शुक्रवार पेठ अध्यक्ष काशिनाथ रूगे, चेअरमन सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन शंकर चौगुले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला हाटगार कोष्टी समाज अक्कलकोट सुनंदा अष्टगी, अध्यक्ष श्री सिद्धारूढ सेवाभावी संस्था गवळी वस्ती श्रीशैल होळीकट्टी, अध्यक्ष सेवा संघ परमेश्वर कौंचे, बसवराज उडचण आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी आद्य जगद्गुरु देवरदासमय्या यांच्या मूर्तीचे पूजन आणि दीप प्रज्वलन उपस्थित महास्वामीजी आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


दरम्यान हटगार कोष्टी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि पारंपारिक विणकर व्यवसाय असणारा समाजाचा सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही यावेळी प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे प्रगती होत आहे. विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबविले आहेत त्याचा लाभ देखील नागरिकांनी घ्यावे. येणाऱ्या काळामध्ये हटगार कोष्टी समाजाच्या सर्व अडचणी यासाठी मुख्यमंत्र्यांची विशेष बैठक घेऊन त्यामध्ये ते अडचणी सोडवण्यात येतील सर्व जाती धर्मातील बांधवांना न्याय देणारे एकमेव एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आपण खंबीर उभे राहावे, कुठल्याही सामाजिक कार्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी यापुढील काळात निधी कमी पडू देणार नाही