पुरस्कार सन्मान

नाभिक टायगर सेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय सुरवसे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

मुंबई येथे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ व जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या हस्ते देण्यात आले

नाभिक टायगर सेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय सुरवसे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

वागदरी —-[नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य अक्कलकोट तालुका अध्यक्ष संजय सुरवसे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार पु ल देशपांडे अकादमी रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई येथे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ व जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या हस्ते देण्यात आले
यावेळी उपाध्यक्ष के. रवी ,संघटक सतीश साटम, हेमंत सामंत, नामदेव काशिद, दिलिप पटेल, नागप्पा आष्टगी, शहर अध्यक्ष सन्माननीय अरूण विभुते अक्कलकोट येतील ज्येष्ठ समाजसेवक नरसिंग क्षीरसागर वागदरीतील, श्रीशैल भरमदे सौ अलकनंदा विभुते दीपक सुरवसे इतर नाभिक समाज बांधव उपस्थित होते. या वेळी संजय सुरवसे यांना मानाचा स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ, पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आले.
कोरोना काळात संजय सुरवसे यांनी समाजातील गोरगरीबांना घरोघरी जावुन मदत केले आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिति लक्षात घेवुन शैक्षणिक साहित्य वाटप, जळीतग्रस्त कुंटुंबियाना आर्थिक मदत करणे अशा अनेक समाज उपयोगी कार्य सतत करीत आहेत. त्यामुळे या कार्याची दखल राज्य पातळीवर घेतले आहे. स्वता:ची आर्थिक परिस्थिति हलाकीची असताना देखील समाजाचे काही देणं लागत या भावनाने ते कार्य करीत आहेत. या अगोदर देखील दोन वेळा त्यांना जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार देवुन गौरविण्यात आले होते.
या वेळी मुंबई येथील उपस्थित मान्यवराचे श्री स्वामी समर्थ प्रतिमेचे फोटो, शाल श्रीफळ देवुन संजय सुरवसे यांनी सत्कार केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button