दिन विशेष

आदर्श व जनप्रिय व्यक्तीमत्व कै.विजय ऊर्फ बापू पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिना निमित्त विनम्र अभिवादन 

आदर्श व्यक्तीमत्व कै.विजय पाटील

आदर्श व जनप्रिय व्यक्तीमत्व कै.विजय ऊर्फ बापू पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिना निमित्त विनम्र अभिवादन 

HTML img Tag Simply Easy Learning    

कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर वसलेलं,निसर्ग संपन्न सुंदर अस आपल वागदरी हे गाव.या गावाने ,या मातीने अनेक लोकप्रिय,समाज प्रिय व्यक्तिमत्वे जन्माला घालण्याचे महान कार्य वेळोवेळी केलेलं आहे.ज्यांनी आपल्या गावाचा सुगंध सर्वदूर पसरवण्याचे महान कार्य केलेले आहेत.
अश्या आपल्या गावातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्वातील एक महत्वाचं नाव म्हणजे स्वर्गीय श्री.विजय बापू पाटील.ग्रामदैवत श्री परमेश्वरावरती निस्सीम श्रद्धा,भक्ती असलेले,आपल्या सर्व कार्यकर्त्यांच काळीज श्री.विजय बापू पाटील यांना त्या निष्ठुर काळाने अक्षरशः आपल्यातून हिरावून नेल. आज त्यांची चौथी पुण्यतिथी.तीन वर्षा पूर्वी म्हणजेच०४मार्च २०१९रोजी बरोबर ‘**महाशिवरात्री या पुण्य दिनी बापू हे आपल्यातून निघून गेले. बापूंच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.🙏🙏.
स्व.बापूंचा जन्म हा जन सेवेचा वसा आणि वारसा असलेल्या पाटील या पुण्यवंत घराण्यामध्ये झाला. उपजतच त्यांना समाजसेवेचे बाळकडू त्यांच्या घरातून भेटले.बापू हे आपल्या गावातील सर्वधर्म समभावचे प्रतीक होते. गावातील कुटल्याही समाजाचे कोणतेही कार्यक्रम असुदे बापूंना निमंत्रण हे नक्की असायचे.लग्न कार्यामध्ये एकट्या बापूंची उपस्थिती हे हजार लोकांच्या बरोबरीची असायची. बापूंच प्रसन्न, सदैव हसर व्यक्तीमत्व हे पाहुणे मंडळींना देखील आपलंसं करून टाकायचं.बापू जेव्हा माईक हातात घेऊन मंगलअस्टिका म्हनायचे तेव्हा पाषाणरधयी माणसाच्या डोळ्यातून देखील अश्रू आपोआप गळायचे . इतकी त्यांच्या अवाजा मध्ये ताकत होती.बापूंच्या रक्तामध्येच समाज सेवा होती.कोणतेही लहान मोठे कार्यक्रम असुदेत बापू एकदा मनावर घेतले की ,ते पूर्ण होई पर्यंत तेथून हलत नसत.आपल्या स्वतःच्या घरादाराकडे दुर्लक्ष करून बापूंनी समाज सेवेचा वसा शेवटच्या श्वासा पर्यंत जपला .
आपल्या गावची यात्रा आणि पर्व हे आपल्या पाटलांचे अत्यंत जीवाभावाचे विषय.आपल्या या दोन्ही यात्रांची पट्टी उचलण्या पासून ते यात्रा ,पर्व संपेपर्यंत बापू हे तनमन धनाने काम करत असत.या काळामध्ये जे जे प्रमुख पाहुणे म्हणून येत असत,त्यांची सर्व प्रकारची काळजी हे बापू मनापासून घेत असत. आपला भाग बहुभाषिक असल्यामुळे ,जितक्या ताकतीने ते मराठीमध्ये माईकवर्ती बोलत असत ,तितक्याच ताकतीने ते कन्नड मध्ये पण बोलत असत हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे.बापूंनी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन शिवजयंतीची सुरुवात केली.शिव बसव जयंती त्यांच्या पुढाकारातून काही काळ एकत्र साजरी झाली.शिवाजी लेझिम संघाची सुरुवात केली.अनेक सामाजिक ,धार्मिक कार्यक्रम त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावात पार पाडले.
राजकारण हा देखील बापूंच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय.स्व.श्री.अटलबिहारी वाजपेयी,श्री.लालकृष्ण अडवाणी, स्व.श्री.बाळासाहेब ठाकरे,स्व.श्री.प्रमोद महाजन, स्व.श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर होता.त्यांच्या विचारांचा जबरदस्त असा पगडा बापूंवरती होता.स्व.आमदार .बाबासाहेब तानवडे यांच्या सोबत बापूंनी आपल्या तालुक्या मध्ये अनेक सभा गाजवले.बापू हे आपल्या भारदस्त अवाजामध्ये प्रतेक सभा हे गाजवत असत.त्यांच्या वरती,त्यांच्या आवाजा वरती पंचक्रोशीतील अबाल वृद्ध मंडळी प्रेम करत होती. माजी मंत्री.श्री. सिद्धराम म्हेत्रे साहेब आणि बापूंचा पक्ष आणि विचारधारा वेगळी असली तरी साहेब वागदरीला आल्यावर बापूंची आस्थेवाईक पणे विचारपूस करीत असत.अस बापूचं व्यक्तीमत्व होत.इतकं मोठं व्यक्तीमत्व असलेले बापू हे ग्रामपंचायत सदस्य देखील झाले नाहीत या गोष्टीचे खूप दुःख होते.पण त्यामुळे त्यांची लोकप्रियता थोडी देखील कमी झाली नाही .हे देखील तितकच सत्य आहे.बापूंना जसी राजकारण, समाजकरणाची आवड होती ,तितकीच आवड त्यांना शेतीची ही होती.सकाळी व्यायाम करणे,विहिरीमध्ये पोहणे हे देखील ते नित्यनेमाने करत असत.बापूंचा समाज सेवेचा वारसा ही त्यांची दोन्ही मुले श्री.अमर दादा, व श्री.ओम दादा हे गावापासून कामानिमित्त दूर असून देखील समर्थ पने सांभाळत आहेत.
आपल्या अख्ख्या गावाच लाडक व्यक्तीमत्व असलेले आदरणीय बापू हे आपल्यातून लवकर निघून गेले.त्यांचं अस अचानक लवकर निघून जाण् आपल्या गावातील सामाजिक , धार्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण करून गेलं. स्व.बापूंच्या अंत्य यात्रेला अख्खी वागदरी पंचक्रोशी एकवटली होती.गावातील अबाल वृद्ध ही शोक सागरात बुडाली होती. प्रत्येजण धाय मोकलून रडत होती.बापू देहाने जरी आपल्यातून निघून गेले असले तरी ते विचार रूपाने आपल्यात कायम असतील यात शंका नाही.माझ्या बघण्या मध्ये आपल्या गावात इतकी प्रचंड लोकप्रियता मिळालेली व्यक्ती मी पहिली नाही.बापू हे आपल्या गावचे वैभव होते.हे वैभव आपल्याला पोरक करून लवकर निघून गेलं.नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं….
असो,स्व.बापूंनी घालून दिलेल्या समाज सेवेच्या मार्गावरून आपण सर्वांनी मार्गक्रमण करण हेच आदरणीय बापूंना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल…..💐💐🙏🙏

HTML img Tag Simply Easy Learning    

शब्दांकन — मारुती शिंदे वागदरी 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button