स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

स्वामींच्या नामस्मरणाने निरामय निर्भयतेचे समाधान अनुभवतोय – अजित गायकवाड

स्वामी दर्शनानंतर नाट्य कलाकार अजित गायकवाड यांचे मनोगत

स्वामींच्या नामस्मरणाने निरामय निर्भयतेचे समाधान अनुभवतोय – अजित गायकवाड

HTML img Tag Simply Easy Learning    

स्वामी दर्शनानंतर नाट्य कलाकार अजित गायकवाड यांचे मनोगत

HTML img Tag Simply Easy Learning    

 मराठी नाट्य क्षेत्रातील अनेक कलाकार स्वामींचे निस्सीम भक्त आहेत. अनेक कलाकार आपल्या कामात व्यस्त असताना सुद्धा स्वामींचे नाम सदा मुखी घेत असतात. त्यामुळे त्यांचे हे कृत्य पाहून मला असे वाटायचे की हे स्वामींचे नाम काम करता करता का घेत असावेत असे मला प्रश्न पडायचे म्हणून एका दिवशी मी सेटवर जायच्या अगोदरच त्यांच्या प्रमाणे मी ही स्वामींचे नाम घेऊन पाहिले. त्यानंतर दिवसभर जी प्रेरणा मिळाली आणि माझ्या शरीरात स्वामींच्या आशीर्वादाचा जो उत्साह संचारला तेव्हापासून मी नित्यपणे स्वामींचे नामस्मरण करीत आहे. आज अनेक दिवसापासून श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणानेच मी प्रत्येक दिनचर्याची सुरुवात करीत असतो. आज अनेक दिवसापासून मी स्वामींचे नाम घेत असल्याने जीवन स्वामी भक्तीने परिपूर्ण आहे. दिवसभर सतत स्वामीचे नाम मुखी असल्याने कोणतेही भय न वाटता काम करण्यास उत्साह वाटतो आता ती नियमितता जीवनात आहे. म्हणून स्वामींच्या नामस्मरणाने निरामय निर्भयतेचे समाधान अनुभवतोय असे मनोगत ‘देव माणूस’ या मराठी सिरीयल मधील कलाकार अजित गायकवाड यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन गायकवाड यांचा सन्मान केला. यावेळी गायकवाड बोलत होते. पुढे बोलताना गायकवाड यांनी स्वामी समर्थांच्या या नामस्मरणानेच मला आज येथे येण्याची ओढ लागल्याने प्रत्यक्ष त्यांच्या वटवृक्ष मंदिरात येऊन स्वामींचे दर्शन घेतल्याने त्या समाधानात आणखीन मोठीच मनशांती लाभली असल्याचे मनोगतही व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी, अविनाश क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – कलाकार अजित गायकवाड यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button