स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

भक्तीने स्वामींना शरण गेल्यास स्वामी कृपा नक्कीच होते – आ.विनोद घोसाळकर

स्वामी सेवेला शरण जात महेश इंगळेंनी साधला वटवृक्ष मंदिराचा चौफेर विकास

भक्तीने स्वामींना शरण गेल्यास स्वामी कृपा नक्कीच होते – आ.विनोद घोसाळकर

स्वामी सेवेला शरण जात महेश इंगळेंनी साधला वटवृक्ष मंदिराचा चौफेर विकास

स्वामी दर्शनाअंती आ.घोसाळकरांचे प्रतिपादन

सध्याच्या युगात अध्यात्माचाही विस्तार होतोय. या पाश्वभुमीवर दत्त संप्रदाय गुरु परंपरेतील स्वामी समर्थ महाराज यांच्या येथील वटवृक्ष मंदिरात अलीकडील काळात खूपच सकारात्मक बदल झालेले आहेत ही स्वामींची इच्छा असेल, कारण मंदिर समितीचे अध्यक्ष इंगळे यांनी स्वामी सेवेला शरण जात मंदिर व गाभारा सुशोभीकर णाच्या माध्यमातून वटवृक्ष मंदिराचा चौफेर विकास साधला आहे. स्वामी भक्तीला व स्वामी भक्तांना हे बदल आवश्यक आहेत, कारण स्वामींनी कर्मकांडात्मक भक्ती पेक्षा भाव भक्तीला जास्त महत्त्व दिले. त्यांची शिकवण खूप सोपी आणि सहज जीवनात उतारवाण्याजोगी आहे. जे काही आहे सर्व त्यांच्या कृपेने आहे. म्हणून भाविकांनी भक्तीने स्वामींना शरण गेल्यास स्वामीकृपा नक्कीच होते असे मनोगत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बोरिवली (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे आमदार व शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केले.
ssgavandi007@gmail.com

ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी विनोद घोसाळकर व त्यांच्या समवेत आलेले हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे, ठाणेचे उपनेते विजय कदम,
कोल्हापूरचे आमदार उल्हास पाटील,
दादरचे युवासेना सचिव साईनाथ दुर्गे यांचाही श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी घोसाळकर बोलत होते. पुढे बोलताना घोसाळकर यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातील स्वामी भक्तांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली स्वामींची माहिती व वटवृक्ष मंदिरात साजरे होणारे विविध सण उत्सव, आरती, पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रम भाविकांना घरबसल्या याची देही याची डोळा पाहण्यास मिळत आहेत ह्या महेश इंगळे यांच्या जीवन कार्यास लाभलेली खूप मोठे स्वामी सेवा कार्य आहे. त्यामुळे त्यांनी विविध धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून वटवृक्ष मंदिराच्या कार्याचा आलेख आणखीन विस्तारित करीत राहावे. याकरिता त्यांच्या पाठीशी माझ्यासह सर्व भाविकांच्या शुभेच्छा नेहमीच असतील असेही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संतोष केंगणाळकर, तालुकाप्रमुख आनंद बुक्कानवरे, शहर संघटक स्वामीराव मोरे, शहर प्रमुख मल्लिनाथ खुबा, अल्पसंख्याख सेनेचे अयाज जमादार, महमूद पठाण, वंचित तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, संजय पवार, श्रीकांत मलवे, ऋषिकेश लोणारी आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – आ.विनोद घोसाळकर व अन्य मान्यवरांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button