श्री वटवृक्ष मंदिरात संपन्न झाली पुण्यतिथी महोत्सव पत्रिकेची पूजा
महेश इंगळेंच्या हस्ते सालाबादप्रमाणे पाडव्याच्या मुहूर्तावर पत्रिका पुजन.

श्री वटवृक्ष मंदिरात संपन्न झाली पुण्यतिथी महोत्सव पत्रिकेची पूजा

महेश इंगळेंच्या हस्ते सालाबादप्रमाणे पाडव्याच्या मुहूर्तावर पत्रिका पुजन.

(प्रतिनिधी, अक्कलकोट, दि. २२/३/२३) येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा १४५ वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी साजरा होत आहे. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन, भजनसेवा कार्यक्रम पत्रिकेचे पूजन आज सकाळी १०:३० वाजता वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते मंदार महाराज पुजारी यांच्या विधिवत मंत्रोच्चारात श्रींच्या चरणी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. प्रारंभी आज दिवशी गुढी पाडव्यानिमीत्त हिंदू धर्म नूतन वर्षाच्या शुभपर्व आरंभी वटवृक्ष मंदिरात मंदिर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी यांच्या हस्ते पहाटे ५ वा.श्रींची काकड आरती संपन्न झाली. यानंतर मंदार पुजारी यांच्या मंत्रोच्चारात महेश इंगळे यांच्या हस्ते वटवृक्ष मंदिरातील श्रींच्या निर्गुण पादूकांस देवस्थानच्या वतीने अभिषेक करण्यात आला. आज गुढी पाडव्यानिमीत्त वटवृक्ष मंदिरातील मुळ गाभाऱ्यातील श्रींच्या मुर्तीस वस्त्र व अलंकारांनी सजविण्यात आले आहे. सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती प्रसंगी श्रींना गुढी पाडव्याचे गोड महानैवेद्य मंदिर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी यांच्या हस्ते दाखविण्यात आले. नैवेद्य आरतीनंतर पाडव्यानिमीत्त दर्शनाकरीता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने शीरा प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हजारो स्वामी भक्तांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन नववर्षानिमित्त नवनवीन संकल्प स्वामींच्या चरणी अर्पण केले. सर्व स्वामी भक्तांचे संकल्प सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच. सर्व स्वामी भक्तांच्या मनोकामना व संकल्प पूर्णत्वास जावे हीच स्वामी समर्थांच्या चरणी शुभकामना व्यक्त करून सर्वांना गुढीपाडव्याच्या व नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर समितीचे पुजारी मोहन महाराज पुजारी, धर्मादाय उपायुक्त सुनिता कंकणवाडी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, पी.आय.जितेंद्र कोळी, उद्योगपती सचिन किरनळ्ळी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रा.नागनाथ जेऊरे, रवि कदम, अमर पाटील, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, बाळासाहेब घाटगे, संतोष जमगे,
ओंकार पाठक, मनोहर देगांवकर, अरविंद कोकाटे आदींसह मान्यवरांना कार्यक्रम पत्रिकेद्वारे निमंत्रीत करण्यात आले.
याप्रसंगी दीपक जरीपटके, श्रीपाद सरदेशमुख, स्वामीनाथ लोणारी, सिध्दाराम कुंभार, सागर दळवी, खाजप्पा झंपले, प्रसाद सोनार, संतोष पराणे, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, रवि मलवे, संजय पवार, संजय पाठक आदींसह अनेक स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – कार्यक्रम पत्रिकेचे पूजन व अनावरण प्रसंगी महेश इंगळे, मंदार महाराज व इतर दिसत आहेत.
