स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

आनंद, ऐेश्वर्य प्रभू रामांच्या आचरणाने मिळेल वटवृक्ष मंदिराच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न ह.भ.प.योगीराज महाराज

श्रीराम मंदिरात भक्ती भावाने पार पडला जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम

आनंद, ऐेश्वर्य प्रभू रामांच्या आचरणाने मिळेल – ह.भ.प.योगीराज महाराज

श्रीराम नवमी कीर्तन सेवेत केले विवेचन

वटवृक्ष मंदिराच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न

श्रीराम मंदिरात भक्ती भावाने पार पडला जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम

(शब्द संकलन – श्रीशैल गवंडी )
प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थांमध्ये सर्व प्राणी मात्रांवर छञछाया दाखवून त्यांच्यावर अलौकीक कृपा करण्याची साम्यता आहे. श्रीराम हे हिंदू धर्मातील आदर्श दैवत असून जगकल्याणासाठी व धर्म रक्षणासाठी प्रभुरामचंद्रानी आपल्या आयुष्यातील प्रत्येक श्वास अन क्षण खर्च केला त्या प्रभुरामचंद्राचं स्मरण व आचरण आपल्यासाठी जीवनातील संकट हरण करणारं आहे. या विचाराने आपण आपल्या जीवनात वाटचाल केली तर आपल जीवनही आनंदरुप होईल. प्रभुरामचंद्रांचे विचार देव, देश, धर्म यांना एकत्रित ठेवतात. त्यांचे नीती मूल्य व तत्वांचे पालन आपण आपल्या जीवनात केल्यास आपल्या जीवनात आनंद व ऐश्वर्याची अनुभूती श्रीरामांच्या आचार विचाराने मिळेल असे विवेचन औरंगाबाद येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.योगीराज महाराजांनी व्यक्त केले. ते येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्रीराम नवमी निमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सेवेत विवेचन करताना बोलत होते. येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिरात व वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाने रामनवमी जन्मोत्सव मोठ्या आनंदाने व श्रध्येय भक्तीभावाने साजरा करण्यात आला. श्री वटवृक्ष मंदिराच्या ज्योतीबा मंडपात दिनांक २८/३/२३ ते दिनांक ३०/३/२३ अखेर ह.भ.प.श्री.योगीराज महाराज प्रकाश गोंदीकर यांची श्रीराम कथेवर आधारित कीर्तनसेवा संपन्न झाली. आज श्रीरामनवमी रोजी दुपारी १२ वाजता पुरोहित मंदार पुजारी यांच्या पौरोहित्याने मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती व पाळणा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
तसेच देवस्थानच्या स्टेशन रोडवरील पुरातन कालीन श्री राम मंदिरात श्री रामाच्या मूर्तीस सकाळी ६ वाजता देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांचे हस्ते रुद्राभिषेक मनोहर देगांवकर यांच्या मंत्रोच्चारात संपन्न झाला. तदनंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाची भजनसेवा, जन्मोत्सव व पाळणा होऊन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजे साहेबांच्या हस्ते आरती संपन्न झाली. तदनंतर देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांना भोजन महाप्रसाद देण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर रामनवमी निमित्त श्रीरामाच्या दर्शनाकरिता भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, शकुंतला साळूंके, कौसल्या जाजू, निर्मला हिंडोळे, निंगू हिंडोळे, लक्ष्मी पाटील, सुरेखा तेली, नलिनी ग्रामोपाध्ये, इंदूमती जंगाले, देवस्थानचे विश्वस्त संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, संतोष पराणे, दीपक जरीपटके, भिमराव साठे, शिवशरण अचलेर, लक्ष्मण पाटील, विलास कटारे, दीपक पोतदार, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, संजय पवार, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, नरसिंग क्षीरसागर, ऋषिकेश लोणारी, बाबूराव कदम, झिपरे मॅडम, कल्पना पाटील, ज्योती झिपरे, विमल साठे, श्यामला देशमुख, शिलवंती बणजगोळे आदींसह हजारो भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – श्रीराम जन्मोत्सव प्रसंगी आरती करताना चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, मंदार महाराज, तर दुसऱ्या छायेत कीर्तन सेवेत योगीराज महाराज व श्रीराम मंदीरातील भजन, जन्मोत्सव प्रसंगी उज्वलाताई सरदेशमुख /सहकारी, व आरती प्रसंगी श्रीमंत मालोजीराजे भोसले राजेसाहेब व भाविक दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button