हन्नुर येथे आरोग्य शिबिरात 68 जणांची डोळे तपासणी व 206 महिला व पुरुषांची औषधोपचार.
प्रविण हाताळे मित्रपरिवार यांच्या वतीने बुधवारी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात एकूण 274 जणांचे तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले.

महादेव मंदिर आवारात हे शिबिर झाले. प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. व तसेच अध्यक्ष स्थानी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे होते प्रतिमा पूजन विश्वनाथ भरमशेट्टी यांनी केले

याप्रसंगी परिसरातील 274 वयोवृद्ध, माता भगिनींची आरोग्य तपासणी करून, निदान करून रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आजारांसाठी औषध, गोळ्या देण्यात आल्या.

याप्रसंगी जंगले गुरुजी, सोपान निकते, आनंद बुक्कानुरे प्रथमेश म्हेत्रे इत्यादी मार्गदर्शन केले.
डोंबरजवळगे सरपंच चिदानंद माळगे, बुरानापूर सरपंच मैनुद्दीन पटेल आरळी सरपंच अजय सगट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

यावेळी सूत्रसंचालन सिद्धाराम पुजारी यांनी केले.
तसेच गावातील महिला भगिनी जेष्ठ नागरिक प्रतिष्ठित व्यक्तींचा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोळे तपासणी व आरोग्य शिबिर आलेल्या डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार
जय महाराष्ट्र