मनुष्य जन्माचं कल्याण सद्गुरू महिमा जाणून सदाचरण करण्यातच आहे – डॉ.मुळे
वटवृक्ष मंदिरातील धर्मसंकीर्तन महोत्सवातील कीर्तन सेवेत केले निरूपण.

मनुष्य जन्माचं कल्याण सद्गुरू महिमा जाणून सदाचरण करण्यातच आहे – डॉ.मुळे

वटवृक्ष मंदिरातील धर्मसंकीर्तन महोत्सवातील कीर्तन सेवेत केले निरूपण.

प्रपंच्यात माणसाला एकही गोष्ट स्वबळावर करता येत नाहीत. सतत कोणी ना कोणी आधाराला मदतीला लागतो. यासाठी मी जेव्हा आम्ही होतो तेव्हाच स्वामी समर्थ होऊन परमार्थासाठी भिऊ नकोस मी सदैव पाठीशी आहे याची प्रचिती देतात. म्हणून मनुष्य जन्माचे कल्याण सद्गुरु महिमा जाणून सदाचरण करण्यातच आहे, असे निरूपण औरंगाबाद येथील ह.भ.प.डॉ.सविता मुळे यांनी केले. श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील आजचे सातवे पुष्प ह.भ.प.डॉ. सविता मुळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने गुंफले गेले. यावेळी निरूपण करताना मुळे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी डॉ.सविता मुळे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. कीर्तन सेवेत पुढे निरूपण करताना डॉ.सविता जयंत मुळे यांनी पूर्वरंगासाठी पंतमहाराज बाळेकुंद्रेकर यांचा “आम्ही जाणो गुरुचे ” हा अभंग घेतला. सद्गुरु महात्म्य वर्णन करताना कीर्तनकार मुळेताई यांनी अक्कलकोटचे महत्त्व सांगितले. आयुष्यात संताचे विचार हाच सत्संग फार मोलाचा आहे. असा संतसंग घडावा अशी प्रार्थना स्वामी चरणी केली. एकनाथ महाराज यांना जनार्दन स्वामी सद्गुरु कसे प्राप्त झाले, आणि सद्गुरुकृपेनी नाथांना दत्तात्रेयांचा अनुग्रह प्राप्त झाला त्यांचा प्रपंच आणि परमार्थ सार्थकी लागला. हे केवळ गुरुकृपेने घडले असा गुरुभाव जागृत ठेवून एकनाथ महाराज आपले जीवन कृतार्थ करतात. असेही निरूपण कीर्तन सेवेच्या उत्तरार्धात सविता मुळे यांनी केले. या कीर्तन सेवेत त्यांना तबल्यावर सुमेध मुळे, संवादिनी साथ दिनेश डोळे, तर झांजेची साथ रेवा मुळे यांनी साथसंगत केली. याप्रसंगी मंदिर समितीचे मोहनराव पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, विपुल जाधव, बंडेराव घाटगे, भीमराव भोसेकर, दीपक जरीपटके, शिवशरण अचलेर, सुनील पवार, अमर पाटील, ज्ञानेश्वर भोसले, प्रकाश सुरवसे, श्रीशैल गवंडी, मनोज कामनूरकर,
संतोष जमगे, संतोष इंगोले, श्रीकांत मलवे, मनोहर देगावकर, मोहन जाधव, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, रवीराव महिंद्रकर, आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – धर्मसंकीर्तन महोत्सवातील कीर्तन सेवेत निरूपण करताना ह.भ.प.डॉ. सविता मुळे दिसत आहेत.
