श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या अन्नछत्र सेवा ही, एक पुण्यकार्य असल्याचे मनोगत मुंबईचे वैद्यकीय आयुक्त विनय सावंत
विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या अन्नछत्र सेवा ही, एक पुण्यकार्य असल्याचे मनोगत मुंबईचे वैद्यकीय आयुक्त विनय सावंत

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नछत्र सेवा ही, एक पुण्यकार्य असल्याचे मनोगत मुंबईचे वैद्यकीय आयुक्त विनय सावंत यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी सोलापूर सुरक्षा दलाचे महिबूब शेख व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खबरे, विश्वस्त संतोष भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले, सागर याळवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
