गोगांव मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतीक भवन चे भूमिपूजन संपन्न
श्री मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते एक करोड बारा लाखाच्या विविध चौदा कामाचे भुमिपूजन

गोगांव मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतीक भवन चे भूमिपूजन संपन्न

श्री मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते एक करोड बारा लाखाच्या विविध चौदा कामाचे भुमिपूजन

अक्कलकोट ( प्रतिनीधी ): गोगांव, ता अक्कलकोट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती पूर्व संध्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन चे भूमिपूजन युवा आयकॉन नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रम अध्यक्षस्थानी सरपंच वनिता सुरवसे हे होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रदीप जगताप, नंदू आणा सुरवसे, कलेणी जीरगे, प्रदीप पाटील, संतोष पोमाजी,अप्पासाहेब बिराजदार , उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, किरनळी सरपंच सतीश कणमुसे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार, शरणप्पा कलशेट्टी, कलावती गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे गोगांव गावावर कायमच प्रेम असून आज पर्यंत न मागता खूप दिले आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे कामासाठी सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करत आहेत लॉकडाऊन मुळे निधी मिळू शकले परतू गेल्या वर्षी सरपंच मॅडम दिलेल्या शब्दाप्रमाणे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याचं बरोबर इतर विविध कामाचे मिळून एक कोटी बारा लाख निधीचे भूमिपूजन करण्यात आले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्या जागी त्यांचे बंधू नगरसेवक मिलन दादा कल्याणशेट्टी यांचे हस्ते एकूण एक करोड बारा लाखाच्या चौदा कामाचे भुमिपूजन संपन्न झाले, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी फोन वर संपर्क साधून येत्या 3-4 महिन्यात आजून एक करोड ची कामे गोगावला देणार असे आश्वासन सरपंच सौ वनिता सुरवसे यांना दिले.आमदार सचिन दादा, खासदार जयसिद्धेश्वर महाराज आणि आमदार कपिल पाटील यांचे गोगावसाठी भरीव निधी दिल्याबद्दल सरपंच सुरवसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी केले आभार मधुकर सुरवसे यांनी मानले.
