रमजान ईद निमित्त अन्नछत्र मंडळातील मुस्लिम सेवेकाऱ्यांना सणा करिता लागणाऱ्या साहित्यांचे किट वाटप करण्यात आले.
कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासकडून नेहमीच सेवेकरी, कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिले जाते

अक्कलकोट :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासकडून नेहमीच सेवेकरी, कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिले जाते, त्या अनुषंगाने रमजान ईद निमित्त अन्नछत्र मंडळातील मुस्लिम सेवेकाऱ्यांना सणा करिता लागणाऱ्या साहित्यांचे किट वाटप करण्यात आले.

दरम्यान न्यासाच्या महाप्रसादलयात प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते व सचिव शामराव मोरे, मनोज निकम, अभियंता अमित थोरात यांच्या उपस्थितीत किट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी महिबूब सत्तार, तनेजा सत्तार, शाहेदा शेख, जैराबी शेख, महिबुबी शेख, सद्दाम शेख, रफिक शेख, मुन्ना मकानंदार, गुडुभाई शेख, मुलुक मकानंदार, दिलसन ओजे, मुलूकशा मकानंदार या मुस्लिम सेवेकाऱ्यांना सणा करिता लागणाऱ्या साहित्यांचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
