वागदरीत जगातील पहिले महात्मा,लोकशाहीचे आद्य जनक,महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी…
समाजाला “कायक वे कैलास” आणि “दासोह” अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या.

वागदरीत जगातील पहिले महात्मा,लोकशाहीचे आद्य जनक,महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी…

वागदरी – जगातील पहिले महात्मा,लोकशाहीचे आद्य जनक,बसवेश्वर महाराज यांची जयंती निमित्त वीरशैव कक्कय्या सभागृह येथे जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.तत्पूर्वी सरपंच श्रीकांत भैरामडगी व वागदरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विपीन सुरवसे साहेब यांच्या शुभहस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच श्रीकांत भैरामडगी बोलताना म्हणाले महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते.महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. त्यांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली.महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धता निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजाला “कायक वे कैलास” आणि “दासोह” अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या.
तसेच सुधीर सोनकवडे यांनी बसवेश्वर बदल बोलताना म्हणाले तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांच्या पुढाकाराने १२ व्या शतकात घडला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला. तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांच्या पुढाकाराने १२ व्या शतकात घडला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला.असा आंतरजातीय विवाह तो ही १२ व्या शतकात हे खूपच क्रांतिकारक आणि धाडसी होतं
यावेळी युवा नेते रवी वरनाळे, सुधीर सोनकवडे,मंत्री शिवराज पोमाजी,रमेश सावंत,विकास नंजूंडे, परमेश्वर देवस्थान कमिटी अध्यक्ष सिद्धाराम बटगेरी, परमेश्वर मुनोळी सर,सिद्धाराम कोळी,विजय शिंदे,गणेश शिंदे,नितीन चौगुले,मल्लिनाथ सोनकवडे,राम मोरे,शिवशंकर पोमाजी,सुरेश सावंत,अमोल कटकधोंड व वागदरीतील ग्रामस्थ बंधू मोठ्या संख्याने उपस्तीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुधीर सोनकवडे सर यांनी केले.
