डोंबिवली बदलापूर स्वामीभक्त मंडळींची शतक महोत्सवी आध्यात्मिक उपासना
महेश इंगळेंच्या सहकार्याने शतक महोत्सवी उपासनेकडे वाटचाल - सोमदत्त आसोलकर

डोंबिवली बदलापूर स्वामीभक्त मंडळींची शतक महोत्सवी आध्यात्मिक उपासना

१३ मे रोजी धार्मिक कार्यक्रमांचे शतक महोत्सवी पर्व

महेश इंगळेंच्या सहकार्याने शतक महोत्सवी उपासनेकडे वाटचाल – सोमदत्त आसोलकर

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१०/५/२३) – श्री स्वामी समर्थ दैवत माझे हा ध्यास उराशी बाळगून गेल्या शंभर महिन्यांपासून डोंबिवली बदलापूरकरांची धार्मिक कार्यक्रमांची मासिक सेवा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी चरणी अर्पण होत आहे. या धार्मिक कार्यक्रमांच्या उपासनेचे यंदा शंभरावा महिना असून येत्या १३ व १४ मे रोजी वटवृक्ष मंदिरात डोंबिवली बदलापूरकरांच्या वतीने कीर्तन, नामस्मरण, नामजप, भक्तीसंगीत आदी विविध कार्यक्रमाच्या अविष्काराने शतक महोत्सवी पर्वसंपन्न होणार आहे. याप्रसंगी बोलताना डोंबिवली बदलापूरचे स्वामीभक्त सोमदत्त असोलकर यांनी देवस्थानचे तत्कालीन चेअरमन कै.बाळासाहेब इंगळे यांच्या प्रेरणेतून आम्ही स्वामी चरणी सेवा करण्यास आलो होतो. पुढे मंदिर समितीचे विद्यमान चेअरमन महेश इंगळे यांच्या अत्यंत मौलिक सहकार्याने ही सेवा वृध्दींगत होत गेली. कोरोनामुळे लॉकडाऊन काळातही ऑनलाइन भक्ती संगीत सेवा, कीर्तन सेवा, संपन्न झाले. तो काळ अत्यंत खडतर होता. सर्वांसाठीच परीक्षा घेणारा होता. आपल्यासारखे भक्तगण ऑनलाइनच्या माध्यमातून का होईना त्या काळात स्वामींचे स्मरण केल्याने या सर्व संकटातून आपण सुखरूप तारून निघालो. त्यानंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या पुढाकाराने स्वामींनी पुन्हा येऊन मासिक सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली व देत आहेत. भावभक्ती मनातून असल्यास ही सेवा नक्कीच देवापर्यंत पोहोचते याची आपल्याला सार्थ प्रचिती येत आहे. त्याचे कारण म्हणजे आता येणाऱ्या शंभराव्या मासिक सेवेची आमची भक्ती स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचलेली आहे याची आम्हाला जाणीव आहे. अशीच सेवा आजन्म घडत राहावी हीच स्वामी चरणी प्रार्थना असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते.
