पदोन्नती ही माझ्यावरील स्वामीकृपाच – उपजिल्हाधिकारी मरोड
उपजिल्हाधिकारी अंजली मरोड व त्यांच्या भगिनींचा सन्मान करताना महेश इंगळे दिसत आहेत.

पदोन्नती ही माझ्यावरील स्वामीकृपाच – उपजिल्हाधिकारी मरोड

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१०/५/२३) – स्वामी समर्थांचे आशीर्वाद माझ्या कुटुंबीयांवर नेहमीच आहेत. स्वामी कृपेने अक्कलकोटला स्वामींच्या पावनभूमीत तहसीलदार पदावरून प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवा करण्याची संधी लाभली. अक्कलकोटला असल्याने स्वामींच्या मठात नेहमीच येणे जाणे असायचे, त्यामुळे कामाच्या माध्यमातून का होईना स्वामी दर्शनाकरिता बोलून घेत असतात याचा विशेष आनंद होता.
स्वामीकृपा असल्याने जास्त लांब न जाता सोलापूरलाच इतके दिवस प्रशासकीय माध्यमातून विविध पदावरून काम करण्याची संधी मिळाली. आता स्वामी कृपेनेच पदोन्नती होऊन उपजिल्हाधिकारी पदी काम करण्याची संधी लाभल्याने आनंदच आहे. या माध्यमातून बढतीने मिळालेली पदोन्नती ही माझ्यावरील स्वामी कृपाच असल्याचे मनोगत उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी व्यक्त केले. ते नुकतेच उपजिल्हाधिकारी पदी बढती मिळाल्यानंतर प्रथमच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी अंजली मरोड व त्यांच्या भगिनींचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. यावेळी बोलताना मरोड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रसाद सोनार, गिरीश पवार, संजय पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – उपजिल्हाधिकारी अंजली मरोड व त्यांच्या भगिनींचा सन्मान करताना महेश इंगळे दिसत आहेत.
