अक्कलकोट ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा महोत्सवातील अमावास्या या मुख्य दिवशीच्या तब्बल बारा तास मिरवणुकीचा शुभारंभ..
शांतलिंगेश्वर हिरेमठ चे मठाधिपती श्री. ष.ब्र. जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी व विरक्त मठाचे मठाधिपती श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.
अक्कलकोट ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा महोत्सवातील अमावास्या या मुख्य दिवशीच्या तब्बल बारा तास मिरवणुकीचा शुभारंभ..
अक्कलकोट, दि. १९- येथील ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा महोत्सवातील अमावास्या या मुख्य दिवशीच्या तब्बल बारा तास मिरवणुकीचा शुभारंभ शांतलिंगेश्वर हिरेमठ चे मठाधिपती श्री. ष.ब्र. जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी व विरक्त मठाचे मठाधिपती श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, महेश इंगळे, माजी नगरसेवक महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, रामचंद्र समाणे,नागराज कुंभार, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, आरपीआयचे नेते अविनाश मडिखांबे, उद्योगपती अप्पासाहेब पराणे, सुनील गोरे, प्रथमेश इंगळे, निखिल पाटील, भाजपचे अल्पसंख्याक अध्यक्ष नन्नु कोरबू, शकील नाईकवाडी, बाबुराव बिराजदार, रेवणसिध्द मंगरुळे, महेश कलशेट्टी, सहाय्यक निबंधक चे अधिकारी सिध्देश्वर कुंभार, श्री चौडेश्वरी ट्रस्ट चे अध्यक्ष काशिनाथ कुंभारे व शरणप्पा कुंभार, प्रा. सुर्यकांत कडबगांवकर, धोंडप्पा कुंभार, सुरेश कुंभार उपस्थित होते.
प्रारंभी अमावस्यानिमित्त पहाटे श्री ची पूजा व आरती वैदिकत्वात झाली. त्यानंतर भाविकानां नैवेद्य दाखविण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी मंदिर खुला ठेवण्यात आले होते. यावेळी अनेक भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, सप्तरंगी बाशिंग श्री देवीला अर्पण केले.
श्री ची मिरवणुक कुंभार गल्ली पासून ते टिळक गल्ली, मेन रोड, खोडवे गल्ली, हरवाळकर गल्ली, विजय चौक, ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान, समाधी मठ, खासबाग गल्ली, हन्नूर नाका, बुधवार पेठ, धनगर गल्ली मार्गे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ठिकठिकाणी मिरवणूकीचे स्वागत भाविक मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. देवीची दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. रात्री मंदिरात साडे अकरा वाजता महामंगलारतीने मिरवणुकीची सांगता करण्यात आले. यावेळी प्रसाद वाटप करण्यात आले.
फोटो ओळी — अक्कलकोट – येथील ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीच्या याञा महोत्सवानिमित्त श्री देवीची सवाद्य मिरवणुकिचा शुभारंभ महास्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.