
नूतन नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी यांचा विजय बागेत जंगी सत्कार
HTML img Tag
तीर्थक्षेत्र अक्कलकोट जनतेच्या विक्रमी मताधिक्याने नवनिर्वाचित झालेले अक्कलकोट नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष श्री. मिलनदादा कल्याणशेट्टी यांचा विजय बाग, अक्कलकोट येथे भव्य सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी यांना श्री स्वामी समर्थांची शाल, तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.
या सत्कारप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थाध्यक्ष जनमेंजयराजे विजयसिंहराजे भोसले, सचिव श्री. शामराव मोरे काका, उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त भाऊ कापसे, समर्थ दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गणेश भोसले, रमेश हल्संगी, संतोष माने, असद फुलारी, प्रगतशील शेतकरी अभिषेक लोकापुरे, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते आतिशजी पवार यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासासाठी अपेक्षा व्यक्त केल्या.



