प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर होणार
प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर होणार

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर होणार
Maharashtra HSC Result 2023 Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

Maharashtra HSC Result 2023 Date : गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी विविध वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी https://www.mahahsscboard.in/ त्यासोबतच http://mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org आणि http://mahresults.org.in या लिंकवर जाऊनही निकाल पाहू शकतात.

