श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तडवळ येथील जयशंकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बारावीचा यंदा 90.38%
दोन्ही विभागातील उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार नूतन सभापती सिद्रामप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अककलकोट दि.27 प्रतिनिधी श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तडवळ येथील जयशंकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बारावीचा यंदा 90.38% लागलेला असून 104 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .
वाईस. अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयशंकर हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालयचा इयत्ता बारावी मराठी कन्नड माध्यमाचा 90.38% निकाल लागला आहे या दोन्ही विभागातील उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार नूतन सभापती सिद्रामप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक निलप्पा विजापुरे सुरेश झळकी पिरोजी शिंगाडे निजामुद्दीन बिराजदार भीमाशंकर विजापुरे रमेश कोटगी यांची यावेळी प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या निगम्मा हिरेमठ ७१.६७ बसवराज राठोड ७१.१७ श्रुती पाटील 70.17 कन्नड माध्यमातून निर्मला व्यक्ती 77.17 राणी बोमाणे 74.50 गीता मैसलगीकर 73.67 या कॉलेजच्या मराठी व कन्नड माध्यमातून उद्यान झालेल्या पहिल्या तीन मध्ये आहेत संस्थेचे अध्यक्ष तथा तालुक्याचे माजी आमदार विद्यमान बाजार समिती सभापती सिद्धरामप्पा पाटील यांच्या हस्ते या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सभापती सिद्रामप्पा पाटील यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शिक्षण क्षेत्रात आपला आई-वडिलांचा नाव कमवावा या पुढील शिक्षणासाठी परदेशात जाऊन शिक्षण घेत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे ग्वाही त्यांनी यावेळी दिली..
याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य यांच्या दोड्याळकर यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आभार मानले
दरम्यान संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे नुकतीच अक्कलकोट बाजार समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक स्टाफ च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राध्यापक गुरुनाथ विजापुरे श्रीशैल ऐवळे विनीत बिराजदार रतनसाब मकानदार आदी उपस्थित होते
