स्वामीरत्न पुरस्कार म्हणजे स्वामींचा आशीर्वाद – महेश इंगळे
पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडला स्वामीरत्न पुरस्कार सोहळा.समर्थ नगरी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय उपक्रम.

स्वामीरत्न पुरस्कार म्हणजे स्वामींचा आशीर्वाद – महेश इंगळे

पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडला स्वामीरत्न पुरस्कार सोहळा.समर्थ नगरी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय उपक्रम.

पुरस्कार सोहळ्यास महेश इंगळे व अण्णू महाराजांची प्रमुख उपस्थिती.

(अक्कलकोट प्रतिनिधी, दि.३/६/२३)

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश देऊन स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना त्यांचे आधार असल्याचे संकेत दिले. त्याचबरोबर महाराजांनी ‘हम गया नही जिंदा है’ हा संदेश देऊन सर्व भक्तांच्या सोबत आपण सदैव असल्याचे संकेत दिले. स्वामी भक्तानी महाराजांच्या कृपाछायेखाली आपले जीवन व्यतीत करावे, कारण समर्थ नगरी परिवाराच्या वतीने देण्यात आलेला स्वामी संदेश व स्वामीरत्न पुरस्कार म्हणजे स्वामींचा आशिर्वाद असल्याचे उपदेश श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले. नुकतेच पुण्यातील वातानुकूलित अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात अक्कलकोटच्या समर्थनगरी प्रतिष्ठान संचालित समर्थनगरी अध्यात्मिक समितीच्या वतीने प्रथमच संदेश स्वामीचा व स्वामी रत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्यातील विविध क्षेत्रात कार्य करून भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांना महेश इंगळे व अण्णू महाराज यांच्या हस्ते या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी स्वामी भक्तांना मार्गदर्शन करताना महेश इंगळे बोलत होते. या पुरस्कार सोहळ्यास व्यासपीठावर श्री स्वामी समर्थ समाधी मठातील स्वामीभक्त व चोळाप्पा महाराजांचे पाचवे वंशज वे.शा.सं.अण्णू महाराज व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, पुण्यातील सुप्रसिद्ध स्वामीभक्त तथा प्रवचनकार विजयाताई शिरगावकर, प्रथमेश इंगळे, संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा सोहळा पूर्णत्वास नेहण्याकरिता, राज्यस्तरीय समिती उपाध्यक्ष सुयोग झेंडे, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंगवी, सचिव पंकज पाटील, वसंतराव सोनवणे, खजिनदार राजेश त्रिवेदी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप म्हात्रे, वनिता झेंडे, विणाताई कामठे, कोल्हापूरचे निस्सीम स्वामीभक्त सुहास पाटील, राजू एकबोटे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी आदीनी परिश्रम घेतले.

चौकट – पुरस्कार प्राप्त संस्था तथा व्यक्ती.
१) मॅनेजिंग टस्टी ओम प्रकाश राका ,
पुणे पंजरापोळ ट्रस्ट,गोशाळा भोजापूर भोसरी पुणे नाशिक रोड पुणे.
२) डॉ. विठ्ठलराव निवृत्तीराव जाधव (विशेष पोलीस महानिरीक्षक से.नि.महाराष्ट्र )
३) श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर (संस्थापक सचिव) श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड
४) श्री ह.भ. प. प्रकाश महाराज बोधले
(राष्ट्रीय अध्यक्ष -अखिल भारतीय वारकरी मंडळ)
५) श्री योगगुरु दीपकजी शिळमकर ,पुणे
अध्यात्मिक तथा योगध्यान
६) अध्यक्ष – हभप पुरुषोत्तम मोरे, हभप संजय मोरे
श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू ,पुणे .
(आषाढवारी देहू ते पंढरपूर पालखी सोहळा)
७) श्री मयूर रामदासजी वाजगे
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य , नागपूर शहर ,
८)श्री रमेश सुग्रीव चावरे (कोल्हापूर)
९) उपाध्यक्ष सुनिल रासने, महेशराव सुर्यवंशी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे .
१०) अध्यक्ष सुरेंद्र वायकर , प्रताप भोसले .
श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ धनकवडी, पुणे
११) सौ मधुराताई मुकुंद भेलके
श्री मसोबा देवस्थान ट्रस्ट खारवडे तालुका मुळशी पुणे
१२) श्री. प्राध्यापक फ़ुलचंद चाटे (सर)
संचालक – चाटे शिक्षण समूह पुणे
१३) श्री मनोहर भिवाजी उतेकर(कार्याध्यक्ष)
श्री स्वामी समर्थ मंदिर, लोकमान्य नगर, ठाणे – ०६
१४) श्री मंगेश नरसिंह चिवटे (जनआरोग्य सेवा)
१५) श्री नितीन बाबुराव दीक्षित (स्वामी सेवक) अखंड नामजप सेवा परिवार, पुणे.
आदिनी स्वत उपस्थीत राहून सन्मान स्वीकार केला.
चौकट –
या सोहळ्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या समाधी मठातील रक्तचंदन पादुका व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथील स्वामींना नित्य वापरण्यात येणारे वस्त्र एकत्रित दर्शनाकरिता ठेवण्यात आले होते. दर्शनाकरिता स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
फोटो ओळ – संदेश स्वामींचा व स्वामी रत्न पुरस्कार सोहळा वितरण प्रसंगी महेश इंगळे, अण्णू महाराज, पुरस्कारकृत मान्यवर व अन्य दिसत आहेत.