स्वामी दर्शनाने होणाऱ्या समाधानाची तुलना कोणत्याच समाधानाशी होत नाही – सुरेश पतंगे
सुरेश पतंगे व कुटुंबीयांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230604-WA0039-773x470.jpg)
स्वामी दर्शनाने होणाऱ्या समाधानाची तुलना कोणत्याच समाधानाशी होत नाही – सुरेश पतंगे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४/६/२३) – या शाश्वत सृष्टीवर जीवन जगत असताना मनुष्य नेहमी प्रत्येक गोष्टीत समाधान शोधत असतो. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेक लोक मानसिक समाधानाने अतृप्त आहेत. अशा लोकांनी स्वामीभक्तीत येऊन स्वामींचे नामस्मरण नित्य मनन चिंतन केल्यास त्यांचे जीवन निश्चितच समाधानाने आनंदाने भरून जाईल. त्यामुळे स्वामी दर्शनाने व त्यांच्या चिंतनाने त्यांना निश्चितच समाधान लाभेल. म्हणून भाविकांना असे सांगावेसे वाटते की जीवनात स्वामी दर्शनाने होणाऱ्या समाधानाची तुलना अन्य कोणत्याच समाधानाशी होत नसल्याचे मनोगत
सोलापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचे नातलग सुरेश पतंगे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी सुरेश पतंगे दांपत्याचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी पतंगे बोलत होते. यावेळी अक्कलकोट मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, नंदीकोले, तलाठी पंचप्पा म्हेत्रे, गिरीश पवार, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – सुरेश पतंगे व कुटुंबीयांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)