सामाजिक बांधिलकी

स्वच्छ, सुंदर व निरोगी शहर बनविण्यासाठी निसर्ग फौडेंशनची स्थापना : विद्याधर गुरव

स्वच्छ, सुंदर व निरोगी शहर बनविण्यासाठी निसर्ग फौडेंशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल बिराजदार यांनी निसर्ग फॉडेंशनची स्थापना केली असल्याचे गौरव उद्गार विद्याधर गुरव यांनी काढले.

स्वच्छ, सुंदर व निरोगी शहर बनविण्यासाठी निसर्ग फौडेंशनची स्थापना : विद्याधर गुरव
। अक्कलकोट, दि. 4 :
स्वच्छ, सुंदर व निरोगी शहर बनविण्यासाठी निसर्ग फौडेंशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल बिराजदार यांनी निसर्ग फॉडेंशनची स्थापना केली असल्याचे गौरव उद्गार विद्याधर गुरव यांनी काढले.
ते महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या अमृतमोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अक्कलकोट आगार व निसर्ग फौडेंशन यांच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यधर गुरव हे बोलत होते.
यावेळी निसर्ग फौडेंशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल बिराजदार, विद्याधर गुरव, एस.टी. महामंडळाचे एस.एम.कांबळे, एस.एम. कोप्पा, पी.व्ही पडतरे, अभिजीत लोके, निलकंठ कापसे, प्रमोद लोकापुरे, सिध्दाराम मोघे, विजय धरणे, तात्या समाणे, विश्वनाथ देवरमणी आदी प्रमुख उपस्थिती होते.
यापुढे बोलताना म्हळाले की, या फौडेंशनचे कार्य पाहून शेकडो समाजसेवकांनी तन-मन-धनानी एक स्वच्छता दूत म्हणून हिरिरिने काम करित असतात. हे वाकाजोखने सारखे असून काही वर्षभरात फौंडेशनने शहर स्वच्छते बरोबरच वृक्ष लागवड, संगोपन, स्मशानभूमी स्वच्छता, रंगोटी आदी कामे केलेले असून भविष्य काळात शहरात विविध ठिकाणी मुख्या जनावरांना पाण्याचे हौद व निराश्रीत नागरिकांचा मयत झाला असेल तर अंतविधीचा खर्च फौडेंशनच्या वतीने केला जाणार असल्याचे सांगत होते.
या प्रसंगी स्वच्छता दूत सिध्दाराम मोघे, रामलिंग शेरीकर, प्रवीण पडसलगी, विशाल पसारे, शंकर अलोणे, प्रभाकर घिवारे, चन्नू शिंगे, तम्मा शेळके, सुरेश हिरापुरे, प्रभू शाबादे, शिवाजी चौगुले, सुरेश पाटील, शरणू मुदगोंडा, आनंद विभुते, भजे, वैरागकर, शिवानंद कारले, सुरज आळंद आदी मोठ्या संख्येेने उपस्थित राहून स्वच्छ शहर, सुंदर शहर बनविण्याच्या हेतूने अक्कलकोट बसस्थानक परिसर स्वच्छ करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button