गावगाथा

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनला एन. बी.ए.मानांकन

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनला एन. बी.ए.मानांकन

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनला एन. बी.ए.मानांकन

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, 
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे
कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनला नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडिटेशन(NBA) नवी दिल्ली यांच्याकडून मानांकन प्राप्त झाले आहे.
कै.कल्याणराव इंगळे महाविद्यालयास
एन.बी.ए.च्या मूल्यांकन समितीने दि.१५ ते १७ एप्रिल दरम्यान भेट दिली होती. महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्पुटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या सर्व विभागांचे मूल्यांकन या समितीकडून करण्यात आले होते. महाविद्यालयास भेटीदरम्यान समितीने विध्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, महाविद्यालयासाठी उपलब्ध असलेला सुसज्ज इमारत व आवार, स्वतंत्र सभागृह व ग्रामीण भागातील विध्यार्थी घडविण्यामागची तळमळ आदी बाबीबद्दल समाधान व्यक्त केले. एन.बी.ए.नवी दिल्ली यांच्याकडून महाविद्यालयातील उपलब्ध चारही विभागांना मानांकन मिळाल्याची माहिती प्राचार्य श्री एन.बी.जेऊरे यांनी दिली.
कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन हे एन.बी.ए.मानांकन प्राप्त करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे.
कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन हे ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण व वसतिगृहातील विध्यार्थ्यांना दोन वेळचे मोफत जेवण देऊन सामाजिक बांधिलकी जपणारी एकमेव संस्था असल्याचे समितीने आवर्जून नमूद केले.
तंत्रशिक्षण क्षेत्रात या मानांकनास अतंत्य महत्वाचे स्थान आहे आणि महाविद्यालयाने हे अल्पावधितच प्राप्त केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री महेश इंगळे व प्राचार्यानी दिली. प्राचार्य श्री जेऊरे यांनी या यशाचे श्रेय सर्व आजी -माजी विध्यार्थ्यांना, पालकांना, प्रसिद्ध उद्योजक, महाविद्या लयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व क्षेत्रातील हितचिंतक याना दिले.
या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्राचार्य श्री एन.बी.जेऊरे, उपप्राचार्य तथा कॉम्पुटर इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा.विजयकुमार पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग चे विभागप्रमुख प्रा.वैजनाथ खिलारी ,सिव्हिल इंजिनिअरिंग चे विभागप्रमुख प्रा.धीरज जनगोंडा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे विभागप्रमुख प्रा.मल्लू माने, एन.बी.ए. समन्वयक प्रा.विलास चौगुले व शैक्षणिक समन्वयक प्रा. अमोल भावठाणकर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button