नेत्रहीन बुद्धिबळ पटूंकडून प्रेरणा घेण्याची गरज – महेश इंगळे
नेत्रहीन बुद्धिबळपटूंच्या बुद्धिबळ स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी महेश इंगळे, प्रवीण राठी, संजय घोडेराव, पंकज बेंद्रे व अन्य दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230616-WA0072-780x470.jpg)
नेत्रहीन बुद्धिबळ पटूंकडून प्रेरणा घेण्याची गरज – महेश इंगळे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
देवस्थानच्या भक्तनिवास येथील सभागृहात नेत्रहीन बुद्धिबळ स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले मनोगत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
प्रतिनिधी अक्कलकोट
आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक सांघिक खेळांमध्ये सर्वच स्तरातील खेळाडू आपल्या कामगिरीवर आपली छाप पडत असतात. परंतु नेत्रहीन असलेल्या बुद्धिबळपटूंची तुलना अन्य स्पर्धेतील खेळाडूशी करणे अन्यायाचे ठरेल. नेत्रहीन असूनही बुद्धिबळ स्पर्धेतील कौशल्य चाल यातील कसब हे अंध खेळाडू यांना पारंगत असून या बळावर ते आता येथून तीन दिवस आपल्या बुद्धिबळातील कौशल्य दाखवणार आहेत. त्यामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान च्या माध्यमातून स्वामी समर्थांनी त्यांना एक प्रकारे आपल्या अंगी असलेले कलागुणांना वाव देण्याची संधी दिलेली आहे. अंध बुद्धिबळपटूंनी न डगमगता आपले अंगी असलेले कलागुण व कौशल्य दाखवून बुद्धिबळातील कौशल्य समाजासमोर मांडावे. या माध्यमातून या नेत्रहीन बुद्धिबळपट्रूंकडून आपल्या सर्वांना प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या भक्तनिवास हॉलमध्ये
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आणि ऑल मराठी चेस एसोसिएशन फॉर विजुअली चैलेंज्ड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रहीन बांधवांची राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे शुभारंभ ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंडच्या नेतृत्वखाली व मंदीर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थानच्या भक्त निवास येथे झाले. याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय प्रवीण राठी यानी केले. आणि सूत्रसंचालन माननीय अध्यक्ष संजय घोड़ेराव यानी केले. तर आभार प्रदर्शन पंकज बेंद्रे यांनी केले. स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यातून एकूण ९१ स्पर्धक सहभागी झाले आहेत. आलेल्या सर्व स्पर्धकांची निवास व भोजन व्यवस्था श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान च्या वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी डॉ.मनिष स्थूल, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पाठक, मनोज काळे, संतोष पराणे, मोहन जाधव, भीमा मीनगले, रवी मलवे, व खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
फोटो ओळ – नेत्रहीन बुद्धिबळपटूंच्या बुद्धिबळ स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी महेश इंगळे, प्रवीण राठी, संजय घोडेराव, पंकज बेंद्रे व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)