स्वामी समर्थांच्या पावन भूमीत जनसेवा जीवनातील सर्वोत्कृष्ट क्षण – डीवायएसपी यामावार
डीवायएसपी विलास यामावार यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230617-WA0019-361x470.jpg)
स्वामी समर्थांच्या पावन भूमीत जनसेवा जीवनातील सर्वोत्कृष्ट क्षण – डीवायएसपी यामावार
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१७/६/२३) – पोलीस खात्याच्या माध्यमातून आजपर्यंत आपण विविध ठिकाणी जनसेवा केलेली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधितपणे राखणे हे माझे कर्तव्य समजून कार्य करीत आलेलो आहे. त्यामुळे स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीतही पोलीस खात्याच्या माध्यमातून जनसेवा करणे हा एक दुर्मिळ योग आहे. स्वामींनी दिलेली संधी गोड मानून डीवायएसपी पदाच्या माध्यमातून येथील नागरिकांची जनसेवा करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे, म्हणून स्वामी समर्थांच्या पावन भूमीत जनसेवा हे माझ्या जीवनातील सर्वोत्कृष्ट क्षण असल्याचे प्रतिपादन अक्कलकोटचे नूतन डी.वाय.एस.पी.विलास यामावार यांनी केले. ते नुकतेच डी.वाय.एस.पी.पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सर्वप्रथम भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी डी.वाय.एस.पी.यामावार यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी डीवायएसपी यामावर बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, विपुल जाधव, महेश मस्कले इत्यादी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – डीवायएसपी विलास यामावार यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)