पुरस्कार सन्मान

सावित्रीमाई फुले संस्थेचे सावित्ररत्न पुरस्कार प्रदान

सावित्रीमाई फुले संस्थेचे सावित्ररत्न पुरस्कार प्रदान

सावित्रीमाई फुले संस्थेचे
सावित्ररत्न पुरस्कार प्रदान
सोलापूर,दि.16- येथील सावित्रीमाई शिक्षण व बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या यंदाच्या सावित्री रत्न पुरस्काराने विविध क्षेत्रातील आठ जणांना गौरविण्यात आले.
रंगभवन येथील समाज कल्याण केंद्रात झालेल्या या सोहळ्यात अक्षरा व आरोग्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालिका सारिका सचिन नरोटे, हत्तूर- चंद्रहाळच्या सरपंच ज्योती राजेंद्र कुलकर्णी, सोलापुरातील मातोश्री नर्सिंग होमच्या डॉ. योगिनी सचिन जाधव, शंकरलिंग महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री मल्लिनाथ थळंगे, अभियंता / व्यावसायिक महादेव ईरण्णा आकळवाडी, दैनिक संचारचे उपसंपादक नंदकुमार किसन येच्चे, साप्ताहिक शौर्यचे संपादक योगेश्वर विठ्ठलसा तुरेराव, पानमंगरुळचे ग्रामविकास अधिकारी शिवानंद भीमराया सोलापूरे या आठजणांचा सावित्रीरत्न पुरस्कार देऊन समारंभपूर्वक गौरव करण्यात आला. मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते .
या पुरस्काराचे वितरण बांधकाम व्यावसायिक मल्लिकार्जुन आकळवाडी, प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांच्या हस्ते व पानमंगरूळचे माजी सरपंच अकबर मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले . याप्रसंगी पानमंगरूळचे उपसरपंच मलिक मुजावर, सुधीर जोशी, डॉ. सचिन नरोटे, डॉ. सचिन जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सावित्री रत्न पुरस्कार प्रदान सोहळ्यासोबतच आकांक्षा सुर्डी, श्वेता कत्ते, मानसी सुर्डी, राकेश कोळी, विकास क्षेत्री, समर्थ कारले, धानम्मा सोलापुरे, स्नेहा कुंभार, मंजुनाथ कुंभार या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव सोनगी, सिध्दाराम करपे, सुमित नंदीकोल, चिदानंद कुंभार, हजरत पठाण, संगीता भतगुणगी, परमेश्वर आवताडे, प्रवीण सुरवसे आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास बळुंडगी यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष महादेव जंबगी यांनी केले.

फोटो ओळी सोलापूर: सावित्री माई शिक्षण संस्थेच्या सावित्री रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार, अकबर मुजावर, डॉ. सचिन नरोटे, डॉ.सचिन जाधव, संयोजक महादेव जंबगी व अन्य.

–:—-:::—

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button