वीणा सप्ताहाच्या माध्यमातून इंगळे कुटुंबीयांची गुरुसेवा – दीपक जरीपटके
गुरूपौर्णिमेनिमीत्त गुरु मंदिरात वीणा सप्ताहास प्रारंभ ; प्रथमेश महेश इंगळेंच्या हस्ते वीणा पूजन व शुभारंभ

वीणा सप्ताहाच्या माध्यमातून इंगळे कुटुंबीयांची गुरुसेवा – दीपक जरीपटके

गुरूपौर्णिमेनिमीत्त गुरु मंदिरात वीणा सप्ताहास प्रारंभ ; प्रथमेश महेश इंगळेंच्या हस्ते वीणा पूजन व शुभारंभ

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि. २६/६/२३) येथील श्री गुरू मंदीरात गुरूपौर्णिमा उत्सव सालाबादाप्रमाणे मोठया भक्तीभावात व अपार श्रध्देने साजरा होत आहे. या निमित्त सालाबादा प्रमाणे याही वर्षी अखंड नामवीणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या नामवीणा सप्ताहाची सुरुवात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते वीणापुजन व नामजपाने करण्यात आली. याप्रसंगी बोलताना
गुरु मंदीराचे दीपक जरीपटके यांनी स्वामी समर्थांचे परमशिष्य श्री बाळप्पा महाराज यांचे हे मठ आहे. सद्गुरू गजानन महाराजांचे हे स्थान आहे. अशा पवित्र स्थानी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांसह अखंड नामविणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या नामवीणा सप्ताहाचे पुजन व शुभारंभ करण्याचे मान महेश इंगळेंच्या आजोबांपासून इंगळे कुटूंबीयांना आहे. इंगळे कुटूंबीयांच्या वतीने या नामवीणा सप्ताहाची सुरुवात करण्याची ही चौथी पिढी असून यापुर्वी सर्वप्रथम कै.शिवाजीराव इंगळे यांनी याची सुरुवात केली. यानंतर कै. कल्याणराव इंगळे यांनी या नामवीणा सप्ताहाची धुरा अनेक वर्षे समर्थपणे चालविली. हीच परंपरा महेश इंगळे यांनी मागील ८ वर्षापासून जोपासून या नामवीणा सप्ताहाच्या माध्यमातून इंगळे कुटूंबीयांच्या वतीने अखंड गुरू सेवा श्रीच्या चरणी रुजू केली आहे. आता ही धुरा महेश इंगळे यांनी आपले सुपूत्र प्रथमेश इंगळे यांच्यावर सोपविली आहे. या वीणा सप्ताह परंपरेची धुरा पेलण्यास आपणही समर्थ असल्याचे संकेत प्रथमेश इंगळे यांनी आपल्या कार्यातून दिले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी गुरु मंदिरच्या वतीने दीपक जरीपटके यांनी महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी गुरु मंदिरचे व्ही.एस. कुलकर्णी, नारायण कुलकर्णी, विद्याधर पारखे, प्रसाद कुलकर्णी, संजय जरीपटके,
शिवशरण अचलेर, महावीर खोबरे, वीरेश फसगे, गिरीश पवार, सुरेश फडके, सोपानराव गोंडाळ, विपूल जाधव, श्रीशैल गवंडी व भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – गुरू मंदिरात नामवीणा सप्ताहाचे शुभारंभ करताना प्रथमेश इंगळे, महेश इंगळे, दीपक जरीपटके, गिरीश पवार व इतर दिसत आहेत.
