श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील परंपरा जपण्याचे कार्य श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ करीत आहे ,ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज या धर्म कार्याला कोणतीच अडचण येऊ देणार नांहीत प्रा. नितीन बानगुडे-पाटील

व्याख्यान’ विषय – सेवाभाव-अन्नदान व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर ख्यातनाम व्याख्याते नितीन बानुगडे-पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील परंपरा जपण्याचे कार्य श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ करीत आहे ,ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज या धर्म कार्याला कोणतीच अडचण येऊ देणार नांहीत प्रा. नितीन बानगुडे-पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील परंपरा जपण्याचे कार्य श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हे करीत आहेत. अन्नछत्र हे तेजस्वी, ओजस्वी, सबल बनविण्यारे केंद्र आहे. ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज या धर्म कार्याला कोणतीच अडचण येऊ देणार नांहीत असे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून गुरुवार सायंकाळी ७ वा. ‘व्याख्यान’ विषय – सेवाभाव-अन्नदान व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर ख्यातनाम व्याख्याते नितीन बानुगडे-पाटील यांचे व्याख्यानाने ७ वे पुष्प संपन्न झाले.

पुढे बोलताना नितीन बानुगडे-पाटील यांनी म्हणाले की, आंध्रप्रदेश येथील श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिराकडे येण्या-जाण्याकरिता त्याकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी घाट बांधले. त्यांचे हे मोठे महान कार्य पाहून, घाट बांधणाऱ्या मजुरांनी स्ववर्गणीतून मंदिराच्या गोपुराच्या उत्तर बाजूस असलेल्या चौथ्या मजल्यावरील कमानीत छत्रपती शिवाजी महाराजांची कोरीव मुर्ती आजही पाहायला मिळते. छत्रपतींच्या काळातील जिवंत स्मारक असल्याचे सांगून, कर्नाटक राज्यातील छत्रपतीनी स्वराज्यसाठी केलेल्या कार्याबाबत संपूर्ण माहिती त्यांच्या खास शैलीत सांगितले.

 

शिवरायांडून कसे जगावे हे शिकावे तर संभाजी राजांकडून कसे मरावे हे शिकावे. प्रतिकूल परिस्थिती अनकूल कशी करावी हे छत्रपती संभाजी राजांचे चरित्र अभ्यासले की लक्षात येतो. आपला इतिहास उज्जवल आहे. तसाच आपला वर्तमान व भविष्यकाळही उज्जवल करता आला पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

अन्नदान हे श्रेष्ठ दान असून, भोसले पिता-पुत्रांनी तीर्थक्षेत्र अक्कलकोटात स्वामी भक्तासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्थापन करून, एक मातृत्व संस्था कार्याच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबरच समाज उपयोगी कार्य त्यांच्या हातून घडत आहे. अन्नछत्र हे संवेदनशीलतेचे प्रतिबिंब आहे. याबरोबरच छत्रपतींच्या इतिहासासह चालू घडामोडीवर त्यांनी विवेचन करून न्यासाच्या परिसरात शिवस्मारक व धातुशिल्प हे दालन कुठेच पाहायला मिळत नांही असे सांगून मंडळाच्या कार्याची कौतुक केले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आमदार चैनसुख संचेती, दिलीपभाऊ कोल्हे, अशापक बळोरगी, दिलीप सिद्धे, संजय देशमुख, वैभव नागणे, अभिनंदन गांधी, बाबासाहेब निंबाळकर, मोहन डांगरे, प्रमोद मोरे, विश्वनाथ भरमशेट्टी, महेश हिंडोळे, रमेश बारस्कर, शेखर, अभिजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, संगीता भोसले, शैलशिल्पा जाधव, शुभांगी जाधव, व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, लाला राठोड, संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम, वैभव नवले, शिवराज स्वामी, प्रा.शरणप्पा अचलेर, शितल जाधव, जवहार जाजू, शेखर फंड, महादेव भोसले, सनी सोनटक्के, प्रथमेश इंगळे, स्वामीराव मोरे, योगेश पवार, रोहित खोबरे, श्रीकांत मलवे, अतिश पवार, संजय गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, विराज माणिकशेट्टी, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, अरविंद शिंदे, प्रथमेश पवार, सौरभ मोरे, राहुल इंडे, महादेव अनगले व राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसन्न बिराजदार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, किरण जाधव, सागर शिंदे, गणेश गोब्बुर, अप्पाशा किवडे, बाळासाहेब मोरे, रोहन शिर्के, अरविंद शिंदे, अप्पू कलबुर्गी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.

चौकट :
गुणीजन गौरव :
यामध्ये विशेषगौरव पुरस्कार धनेश आचालेर, बोरामणी व अक्कलकोट ग्रामीण सर्कल (महसूल क्षेत्र) ओंकार माने, पंचायत समितीचे रंगनाथ निकम, प्रा. प्रकाश सुरवसे, युवा उद्योजक सचिन उपरे, गोगावाचे माजी सरपंच प्रदीप जगताप यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

चौकट :
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

चौकट :
शुक्रवार दि. ३० जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘रंग विनोदाचे, रंग सुरांचे’ सादरकर्ते – श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, मेघना एरंडे व गायक- स्वप्नील गोडबोले, योगिता गोडबोले आणि सहकारी मुंबई यांचा कार्यक्रम होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button