गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर वटवृक्ष देवस्थानकडून विशेष दर्शन व्यवस्थेचे नियोजन
भाविकांचे स्वामी दर्शन आणखी सुलभतेने होणार - महेश इंगळे

गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर वटवृक्ष देवस्थानकडून विशेष दर्शन व्यवस्थेचे नियोजन

भाविकांचे स्वामी दर्शन आणखी सुलभतेने होणार – महेश इंगळे

(अक्कलकोट,दि.२९/६/२३) –
(श्रीशैल गवंडी) –
येत्या गुरुपौर्णिमे रोजी हजारो स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनाकरिता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देणार आहेत. येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामींचे दर्शन प्रती वर्षापेक्षा यावर्षी आणखीन सुलभतेने व्हावे याकरिता श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कडून विशेष दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. पुढे बोलताना इंगळे यांनी येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे चौथे अवतार आहेत. ते गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु आहेत यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही ३ जुलै गुरुपौर्णिमे रोजी स्वामींना गुरु मानणारे हजारो स्वामीभक्त गुरु भेटीची संधी साधून स्वामी दर्शनाकरिता येणार आहेत. येणाऱ्या स्वामी भक्तांना मंदिर परिसरात बॅरेकेटिंग व यंदा प्रथमच विशेष पध्दतीने गाभाराच्या मागील बाजूतील हॉलमध्ये बॅरेकेटींग करून दर्शन रांगेची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता भाविकांना टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्याचा प्रश्नच राहणार नाही. सरळ सरळ रांगेत दर्शन होणार असल्याने भाविकांना कोणताही नाहक त्रास होणार नाही. त्यामुळे प्रतिवर्षापेक्षा यंदा अधिक सुलभ स्वामी दर्शनाचा अनुभव भाविकांना अनुभवता येईल असेही मनोगत इंगळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
