दिन विशेष

“गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे ‘ गुरूंचा महिमा थोर.”… वेदमूर्ती बसवराज शास्त्री तीर्थ

श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय श्रीक्षेत्र तीर्थ येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला

“गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे ‘ गुरूंचा महिमा थोर.”… वेदमूर्ती बसवराज शास्त्री तीर्थ
श्रीक्षेत्र तीर्थ ता.द.सोलापूर दि.३
श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय श्रीक्षेत्र तीर्थ येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला
प्रारंभी ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वर प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे सोमेश्वर मठाचे मठाधिपती वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांच्या हस्ते संपन्न होऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार सर होते.
यावेळी बसवराज शास्त्री आपल्याआशीर्ववचनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुची परंपरा रामायण महाभारता पासून अखंड चालू असून त्यात काळानुरूप बदल होत गेलेला आहे. “गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात या जगात गुरूंचा महिमा थोर आहे. आपले गुरु आपल्याला समाजामध्ये आदर्श व्यक्ती म्हणून जगायला शिकवतात. असे प्रतिपादन केले प्रा.डॉ.बिराजदार आपले अध्यक्षीय मनोगतात मार्गदर्शन करताना केवळ आपल्याला ज्ञान देणारे मानव रुपी गुरूच पूजनीय आहेत असे नाही तर ज्या घटका पासून आपण ज्ञान मिळवतो उदा. ग्रंथ, पुस्तके, वृक्ष एकुणात या सर्व निसर्ग बाबत कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. अशी धारणा मनात बाळगणे नक्कीच औचित्याचे ठरेल असे प्रतिपादन केले.
यावेळी प्राचार्य सुधीर सोनकवडे प्रा.अमर पाटील प्रा.रेणय्या मठपती व विद्यार्थी चन्नमलय्या मठपती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजीव कोरे तर आभार महेश पट्टणशेट्टी यांनी मानले. तसेच यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button