समाधानी जीवनास स्वामींच्या नामस्मरणाची गरज – भाऊ कदम
भाऊ कदम यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230704-WA0051-374x470.jpg)
समाधानी जीवनास स्वामींच्या नामस्मरणाची गरज – भाऊ कदम
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४/७/२०२३) –
स्वामींचा साक्षात्कार सर्व ठिकाणी आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला होण्याकरीता काय करावे ? याचे उत्तर म्हणजे स्वामी भक्तीत ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल, त्यालाच स्वामींचे अस्तित्व जाणवेल म्हणून तशी भक्ती भावना मनी असावे आणि ती उत्पन्न होण्यासाठी स्वामी समर्थांचे नामस्मरण करण्याची आवश्यकता आहे. असे केल्याने समाधानी जीवन लाभून जीवन प्रसन्नतेने फुलून जातं, त्यामुळे समाधानी जीवनास
स्वामींच्या नामस्मरणाची गरज असल्याचे मनोगत प्रसिद्ध मराठी हास्य कलाकार व मराठी सिरीअल चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांनी व्यक्त केले. ते
नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी भाऊ कदम यांचा स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन सन्मान केला याप्रसंगी भाऊ कदम बोलत होते
याप्रसंगी मंदिर समिती सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संतोष जमगे, प्रसाद पाटील, प्रा.शिवशरण अचलेर, संजय पवार, चंद्रकांत गवंडी इत्यादी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – भाऊ कदम यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)