वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी मैंदर्गी येथे फार पडला ‘गाढवाचं लग्न’…
या गाढवाच्या लग्नाची अनोख्या कार्यक्रमाची चांगली चर्चा सुरू आहे

वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी मैंदर्गी येथे फार पडला ‘गाढवाचं लग्न’…



अक्कलकोट —- बळीराजांनी म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. पाऊस न पडल्याने बळीराजा हवालदिल झाला.पाऊस पडावा म्हणून बळीराजा देवालाही साकडं घालत असतो. जून महिना संपला तरी पेरणी योग्य पाऊस पडला नाही.ऐनपावसाळ्यात वरुणराजाने पाठ फिरवल्याने सोलापूर सह राज्यातील काही जिल्ह्यातील जनता हैराण झाली आहे. त्यामुळे वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात ग्रामस्थांनी ‘गाढवाचं लग्न’ लावण्याचा अनोखा प्रयोग केला आहे.गाढवाला सजवून त्याची शहरात मिरवणूक काढण्यात आली. या गाढवाच्या लग्नाची अनोख्या कार्यक्रमाची चांगली चर्चा सुरू आहे.चक्क गाढवाचेच लगीन लावून दिले आहे. गाढवांना नवरदेवाप्रमाणे सजवून त्यांच्या गळ्यात हार घालत वाजत गाजत त्यांची गावभर मिरवणूक काढली. मोठ्या थाटामाटात गाढवाचं लग्न लावून देण्यात आले. हे वरूण राजाला साकडं घालण्यासाठीच गाढवाचे लग्न लावल्याचं गावकरी सांगत आहेत.माणसाच्या ज्याप्रमाणे लग्नसोहळा होता अगदी त्याच प्रमाणे हा लग्न सोहळ थाटात पार पडला.

गाढवाच्या लग्नाचा सोहळा आटोपल्यानंतर सोलापूर सह राज्यात चांगला पाऊस व्हावा म्हणून ग्रामस्थांनी वरुणराजाची सामुहीक प्रार्थनाही केली.
अशी आहे लोकांची धारणा
वेळेत पाऊस नाही झाला किंवा पेरण्यानंतर दीर्घ ओढ दिल्यास आणि ठिकाणी ज्या त्या वेळेतील नक्षत्राच्या वाहनांची कार्यक्रम घेतली जातात. अगदी बेडकाचीही लग्न लावले जाते. देवाला पाण्यात ठेवणे गाढवाचे लग्न गाढवाची मिरवणूक काढण्यात आले. पाऊस पडतो अशीही धारणा ग्रामीण भागात प्रचलित असल्याने यातूनच मैंदर्गी येथे गाढवाचे लग्न लावण्यात आले.
