स्वामी समर्थांचे आशीर्वाद पाठीशी राहण्याकरिता साकडे – लताताई शिंदे
लताताई शिंदे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना आत्माराम घाटगे व अन्य दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230711-WA0036-780x470.jpg)
स्वामी समर्थांचे आशीर्वाद पाठीशी राहण्याकरिता साकडे – लताताई शिंदे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.११/७/२३) – स्वामी समर्थांची प्रचिती आम्हाला वेळोवेळी येते. त्यामुळे स्वामी भक्ती प्रत्यर्थ तातडीने अक्कलकोट गाठून स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व त्यांचे आशीर्वाद पाठीशी राहण्याकरिता स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन साकडे घातले असल्याचे मनोगत
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव आत्माराम घाटगे यांनी लताताई शिंदे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी लताताई शिंदे बोलत होते. पुढे बोलताना लताताई शिंदे यांनी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्यापूर्वी मी स्वामींच्या दर्शनाकरिता येऊन गेले आहे. येथील मंदिर खूपच प्रसन्न व रमणीय आहे. स्वामी भक्ती करिता व मनशांतीचे प्रतीक आहे. या माध्यमातून स्वामींचे आशीर्वाद हे नेहमीच पाठीशी असतील याची मला नेहमीच सकारात्मक खात्री आहे असेही मनोगत लताताई शिंदे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व मनीष काळजे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, गिरीश पवार आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
- फोटो ओळ – लताताई शिंदे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना आत्माराम घाटगे व अन्य दिसत आहेत.