वाचन हा विषय सर्वाधिक महत्वाचा असून वाचनाने माणूस समृद्ध होतो ; प्रा.चंद्रकांत पोतदार
ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालय भुरीकवठे वतीने मासिक वाचन दिन साजरा.

वाचन हा विषय सर्वाधिक महत्वाचा असून वाचनाने माणूस समृद्ध होतो ; प्रा.चंद्रकांत पोतदार


ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालय भुरीकवठे वतीने मासिक वाचन दिन साजरा.

युवकांनी ज्ञानदान वाचनालयातील स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा लाभ घ्यावा.


भुरीकवठे — येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयामध्ये वाचन दिन वाचन महिना साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शांतमलप्पा खुने हे होते यावेळी सर्वप्रथम श्री लक्ष्मण सुतार यांच्या शुभहस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे खजिनदार श्री शिवाप्पा कुंटोजी यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन केले. संस्थेचे सचिव प्रा.चंद्रकांत पोतदार यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.चंद्रकांत पोतदार आपल्या भाषणात त्यांनी उपस्थित इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून मौलिक मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपस्थित युवा वर्गाला स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्व समजावे, त्यांच्यात वाचण संस्कृती रुजावी या निमित्ताने हा वाचन दिवस साजरा करतोय जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन केल्याने माणसाचा आपल्या सभोवताली असणार्या परिसराकडे,समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो पुस्तके वाचल्याने माणसाला आपल्या आजूबाजूची आपल्या सहवासातील माणसंही वाचता येतात माणसांच्या भावना समजतात आणि आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो एकमेकांना समजून घेतल्याने आपल्यामध्ये माणुसकीची भावना वृद्धिंगत होते.
त्यानंतर लहान मुलांकडून पुस्तकांचे वाचन करून घेण्यात आले आणि शेवटी गावातील आबाला वृद्धांनी ग्रंथालयाचे वाचक सभासद व्हावे व येथील ग्रंथ, वृत्तपत्रे,मासिके, यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक ग्रंथपाल श्री. संजय सोलापूर यांनी केले.
यावेळी आप्पासाहेब कलशेट्टी, सायबणप्पा जमादार,लक्ष्मण सुतार,शांत मलप्पा खुने,शिवप्पा कुंटोजी,दरेश हिरके, श्याम सुतार,अभिषेक सुतार, विक्रम शिदोरे, दिनेश बंदीछोडे ,संस्थेचे सर्व कर्मचारी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.