दिवंगत नगरसेवक सुनीलभाऊ कामाठी यांच्या ४४ व्या जयंतीनिमित्त ५२७ जणांचे रक्तदान…
तरुण वर्गाची रक्तदानासाठी प्रचंड गर्दी...

दिवंगत नगरसेवक सुनीलभाऊ कामाठी यांच्या ४४ व्या जयंतीनिमित्त ५२७ जणांचे रक्तदान…

तरुण वर्गाची रक्तदानासाठी प्रचंड गर्दी…

माजी नगरसेवक आणि खड्डा तालीमचे संस्थापक सुनिल कामाठी यांच्या ४४ व्या जयंतीनिमित्त तब्बल ५२७ जणांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान करण्यासाठी तरुण वर्गाने तुफान गर्दी केली होती.

पाच महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात सुनिल कामाठी यांचे निधन झाले होते. १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. कायम सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा सुनिल कामाठी यांचा वारसा अखंड सुरु ठेवण्यासाठी खड्डा तालीम मित्र परिवारातर्फे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापौर श्रीकांचना यन्नम, श्रीमती सुनिता सुनिल कामाठी, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, काँग्रेस प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी, माजी नगरसेवक तोफिक शेख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, अनिल पल्ली, भारतसिंह बडुरवाले, रामदास मगर, मध्यवर्ती अध्यक्ष मतीन बागवान, लहू गायकवाड, तात्यासाहेब वाघमोडे, रेवण पुराणिक, शेकेश जाधव, राजू जमादार, भूपती कमटम,रमेश यन्नम,नागेश सरगम,अनिल कोंडुर, सचिन गंधुरे, जयंत शेळके, बाबूराव जमादार, महादेव येरनाळ,अशोक दुस्सा, मातंग समाजाचे नेते सुरेश पाटोळे, अप्पू कडगंची, गुलाम पैलवान, यादगिरी बोम्मा, सत्यनारायण गुर्रम, बाळासाहेब गायकवाड, पिंटू चव्हाण, महेश जगदाळे, विजय पुजारी, संदीप पाटील, सूरज पाटील, अजिंक्य पाटील, जंगलाप्पा म्याकल, भारत बटगेरी, चंद्रकांत मानवी, राजेश झंपले, विजय अडसुळे, युवराज मस्के, पवन पल्ली, सागर भागानगरे, हेमंत विटकर, सुमित झंपले, महेश तलाटी, लखन झंपले, काशिनाथ मलवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी नगरसेवक देवेंद्र कोठे व रवी कैय्यावाले यांनीही रक्तदान करीत सहभाग नोंदविला.
रक्तदान करण्यासाठी दिवसभर शेकडो कार्यकर्त्यांनी खड्डा तालीम येथे गर्दी केली होती. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी गजानन कामाठी, स्टेफन स्वामी, प्रकाश मनसावाले, महेश खानोरे, वाहिद शेख, प्रसाद गायकवाड, वैभव परदेशी, दादा पवार, आकाश येळणे, राजकुमार पाटील आदींनी परिश्रम घेतले.
रक्ताचा तुटवडा असताना मोठ्या प्रमाणावर रक्तदान
सोलापूर आणि परिसरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी ५२७ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे