*”टाइम्स ऑफ करजगी* ” संस्थेवतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन २०२४*
सालाबादाप्रमाणे यंदाही 2024 या सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

*”टाइम्स ऑफ करजगी* ” संस्थेवतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन २०२४*

*करजगी* दि.11 येथील *टाइम्स* *ऑफ करजगी* या सामाजिक संस्थेच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही 2024 या सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

लिं. श्री. गुड्डद बसवराज महास्वामीजींच्या मंदिरात व विरक्तमठात श्री. म. नि. प्र. शिवानंद महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या प्रारंभी गावचे सरपंच श्री.विवेकानंद उंबरजे, अक्कलकोट भाजपा कायदा व सेलचे प्रमुख श्री.दयानंद उंबरजे, उपसरपंच श्री. शब्बीर पटेल, माजी सरपंच श्री. शिवलिंगप्पा नरोणे, सदस्य श्री. रवी लिंबोळे, सदस्य श्री. सिद्धप्पा गजा, माजी उपसरपंच श्री.कादर गोडीकट, श्री.पंचप्पा शावळ गुरुजी, श्री. जितेंद्र अनंतपुरे, श्री. शिवकुमार खेड, मल्लू तोडकरी श्री.बसवराज माशाळे,श्री. बसवराज प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.सी. सी. चडचण सर, सहशिक्षक श्री. के. पी. सरसंबी सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींच्या प्रतिमेच्या पूजनांनी श्रीफळ वाढवून दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सदर प्रसंगी श्री.सरसंबी सर, श्री चडचण सर व श्री. दयानंद उंबरजे यांनी सामाजिक संस्थांचे उद्देश काय असावेत.. कोण कोणते नवोपक्रम राबवावेत.. संस्था चालविताना येणाऱ्या अडचणी.. इत्यादी विषयावर आपापले मनोगत व्यक्त केले व टाइम्स ऑफ करजगी या सामाजिक संस्थेकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले तसेच संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टाइम्स ऑफ करजगी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रोहित माशाळे व अध्यक्ष श्री .चौडप्पा मदभावी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.डी.पिरगोंडे सरांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शावळ गुरुजी यांनी केले.
