
वागदरीत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन

वागदरी — वागदरी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.त्याप्रसंगी गोगावचे माजी सरपंच प्रदीप जगताप,उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, शिवसेना शाखाप्रमुख मुगेद्र मुदिनकेरी,संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शाम बाबर,उपाध्यक्ष महादेव सोनकवडे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे, मराठा महासंघाचे तालुका उपाध्यक्ष सुनिल सावंत,मी वंडर महाराष्ट्रचा संघटनेचे सदस्य संजय चौगुले फिरोज तांबोळी, मौला कुरेशी, नरसिंह मोहरकर, अशोक बनसोडे आदि मान्यवर उपस्थित होते.
