चपळगाव प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी!

चपळगाव प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी!

चपळगाव दि:०१/०८/२०२३-
चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि ग्रामीण विद्या विकास सेमी इंग्लिश स्कूल मध्ये आज *भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचे स्मृतीदिन व लोकशाहीर,कथा व कादंबरीकार अण्णाभाऊ साठे* यांची जयंती प्रतिमा पूजन आणि वक्तृत्व स्पर्धेने संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हॅलो मेडिकल फाउंडेशन चे समन्वयक श्री.बसवराज नरे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्राचार्य मूली सरांनी भूषविले.
यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक माने सर, श्रीगिरी सर,एन.एम.पाटील सर उपस्थित होते.


सुरूवातीला प्रशालेतील पाटील मॅडम यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय एन एम पाटील सरांनी केले.

तदनंतर वक्तृत्व स्पर्धेस प्रारंभ झाला.सहभागी सर्व चिमुकल्यांनी आपल्या जोशपूर्ण व उत्साहपूर्ण भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.

प्रमुख अतिथी श्री.बसवराज नरे सरांनी आपल्या मनोगतात सांगितले,थोर क्रांतिकारक व समाजसुधारकांनी राष्ट्र स्वातंत्र्य करताना भारतीय समाज जागृत करण्याचे महान कार्य केले आहे.
प्राचार्य मूली सरांनी आपल्या मनोगतात,
स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे भाषिक व मानसिक जडणघडण होत जाते असे प्रतिपादन केले.
यावेळी सर्व गुरूजन वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षक म्हणून माणकोजी सर, श्रीमती गुरव मॅडम, बनसोडे सर,दुलंगे सर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजापूरे सरांनी केले व आभार प्राचार्य मूली सरांनी मानले.