महसूल विभागाकडून देण्यात येणार्या सेवा आणि विभागाच्यावतीने राबविण्यात येणार्या योजना अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्या, तांड्यातील नागरिकांनी या सप्ताहात सामील होवून याचा लाभ घ्यावा ; आमदार सचिन कल्याणशेट्टी
1 ते 7 ऑगस्ट महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ ...

महसूल विभागाकडून देण्यात येणार्या सेवा आणि विभागाच्यावतीने राबविण्यात येणार्या योजना अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्या, तांड्यातील नागरिकांनी या सप्ताहात सामील होवून याचा लाभ घ्यावा ; आमदार सचिन कल्याणशेट्टी


अक्कलकोट, दि.1 : महसूल विभागाकडून देण्यात येणार्या सेवा आणि विभागाच्यावतीने राबविण्यात येणार्या योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होवून त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी. शासन व शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा याकरिता विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यंदाच्या वर्षी राज्यभरात महसूल दिनापासून महसूल सप्ताह साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार, महसूल मंत्री ना.बाळासाहेब विखे-पाटील व मंत्रिमंडळाने घेतल्याने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्या, तांड्यातील नागरिकांनी या सप्ताहात सामील होवून याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
ते 1 ऑगस्ट पासून सुरुवात होणार्या महसूल सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, तहसिलदार बाळासाहेब शिरसाठ, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे, उत्तरचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, दक्षिणचे पोलिस निरीक्षक महेश स्वामी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष महिबूब मुल्ला यांच्यासह महसूलचे अधिकारी व कर्मचारी, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी 155, आदेश, रेशन कार्ड, विविध दाखले यांचे वाटप करण्यात आले. पुढील सात दिवस मंडळ अधिकारी स्तरावर महसूल सप्ताहनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले.
पुढे बोलताना ठोंबरे म्हणाले, महसूल सप्ताहात विभागाने जिल्हास्तरीय महसूली कामे वेळच्या वेळी पूर्ण करुन वसुलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणाची चौकशी करणे शिबीर, महसूल अदालत आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. याबरोबरच दि.2 रोजी युवा संवाद, 3 रोजी एक हात मदतीचा ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. दि.4 रोजी जनसंवाद, दि.5 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येईल. दि.6 रोजी महसूल संवर्गातील कार्यारत सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा संवाद कार्यक्रम होवून शेवटी दि.7 रोजी महसूल सप्ताहाची सांगता होणार असल्याचे तुषार ठोंबरे यांनी सांगितले.
महसूल विभागाच्या वतीने देण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे, आवश्यक कागदपत्राबाबतची माहिती पत्रके तयार करुन सप्ताहामध्ये सहभाग नोंदवून नागरिकांना याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करुन तलाठ्याकडून अनोंदीकृत दस्ताव्दारे घेण्यात येणार्या फेरफाराबाबत शासनाने ई-हक्क प्रणाली सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. ई-हक्क प्रणालीचा लाभ नागरिकांनी घरी बसून घ्यावेत असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
