अक्कलकोट: येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक व तोलनूर ची रहिवासी दानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जून २०२३ नेट परीक्षेत तब्बल १० विद्यार्थी उत्तीर्ण
अक्कलकोट विक्रमवीर दानय्या कौटगीमठ सर यांचे १० विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण

अक्कलकोट विक्रमवीर दानय्या कौटगीमठ सर यांचे १० विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण


अक्कलकोट: येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक व तोलनूर ची रहिवासी दानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जून २०२३ नेट परीक्षेत तब्बल १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( ऐन टी ए ) नवी दिल्ली यांनी विद्यापीठ अनुदान आयोग (यु जी सी ) नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली जून २०२३ मध्ये ऑनलाइन पद्धतीने प्राध्यापक होण्यासाठी असलेल्या राष्टीय पात्रता परीक्षा ( नेट नॅशनल एलीजीबीलीटी ) घेण्यात आला होता.,याची निकाल २४ जुलै रोजी जाहीर झाला असून या परीक्षेत अक्कलकोट चे शिक्षक दानय्य सर यांच्या मोफत मार्गदर्शन खाली तब्बल १० विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत.

१ प्रा संगीता रेड्डी ( कन्नड ) रायचूर
२ . प्रा भारती एस ( इंग्रजी ) सेडम
३ .रवींद्र के ऐन ( कन्नड ) हासन
४ प्रा राहुल ढवरे ( मराठी ) धाराशिव
५. प्रा निकिता तंकसली ( कॉमर्स ) मुंबई
६ प्रा नविन एस ( कन्नड ) चिकमगळूर
७ . प्रा बसम्मा एच ( कन्नड )तुमकुर
८ . प्रा अर्पण रणदिव ( पाली ) मुंबई
९. प्रा अंबिका ( कन्नड ) यादगिरी
१० . प्रा अभिजित दामसे ( इतिहास ) अहमदनगर
दानय्या सर यांनी यु ट्यूब च्या माध्यमातून नेट सेट परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी साठी मोफत मार्गदर्शन करीत आहेत. नुकताच महाराष्ट्र सेट परीक्षेत दानय्य सरांचे ६५ विद्यार्थी दैदिप्यमान यश मिळविले होते.
देशातील वेगवेगळ्या राज्यतील ५८ वेळ सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होत ,मिळविलेल्या ज्ञान आणि अनुभव इतर विद्यार्थ्यांना सांगत आहे. आता पर्यंत ३७४ विद्यार्थी सेट नेट टी ई टी परीक्षेत यशवंत झाले आहेत