दिन विशेष

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मध्ये लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये जयंतीप्रसंगी ए. व्ही. जोशी, सागर मंडले, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, जगदीश सुरवसे, संगीता देशमुख व अन्य.

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मध्ये लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
मुरुम, ता. उमरगा, (प्रतिनिधी) :
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मंगळवारी (ता. १) रोजी त्यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापिका ए. व्ही. जोशी व सागर मंडले यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी संगमेश्वर लामजने, प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर, धनराज हळ्ळे व प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी संगीता देशमुख, सुभाष धुमाळ, विरेंद्र लोखंडे, पंकज पाताळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश सुरवसे यांनी केले. सुत्रसंचलन एस. बी. जाधव तर आभार व्ही. एच. वैष्णव यांनी मानले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये जयंतीप्रसंगी ए. व्ही. जोशी, सागर मंडले, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, जगदीश सुरवसे, संगीता देशमुख व अन्य.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button