*एनईपी घरोघरी उपक्रमाचा राज्यभरात प्रभाव!* सोलापूर विद्यापीठातील उपक्रमाची राज्यभरात चर्चा!
एनईपी घरोघरी या उपक्रमाच्या वाहनासमवेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

*एनईपी घरोघरी उपक्रमाचा राज्यभरात प्रभाव!*
सोलापूर विद्यापीठातील उपक्रमाची राज्यभरात चर्चा!

सोलापूर- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती प्रत्येक नागरीकांना सहजपणे कळावी, यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घरोघरी (एनईपी घरोघरी) या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सुरू केलेल्या उपक्रमाची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. एनईपी आणि त्यासाठीची माहिती सर्वसामान्यांना अगदी सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच त्याचे महत्व लक्षात यावे यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याने त्याची अंमलबजावणी आता इतर विद्यापीठांमध्ये करण्याची चर्चा विभागात सुरू झाली आहे.


नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये एनईपीची माहिती मिळावी, यासाठी एनईपी घरोघरी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी खास व्हॅन तयार करण्यात आली असून ती विद्यापीठाच्या कार्यकक्षेत असलेल्या गावांमध्ये जाऊन नागरिकांना माहिती देण्याचे काम करत आहे.

एनईपी घरोघरी या उपक्रमाचे गावखेड्यांपासून शहरातील नागरिकांकडून या दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. लोकांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबतची उत्सुकता असल्याने या दिंडीबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी लोक स्वारस्य दाखवत असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.

*नाविन्यपूर्ण उपक्रम*
नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची माहिती ग्रामीण भागामध्ये पोहोचण्यासाठी अत्यंत चांगला उपक्रम या विद्यापीठाने सुरू केला आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना यातून माहिती मिळण्यास मोठी मदत होत असून हा उपक्रमच एकूण खूप स्वागतार्ह आहे. इतर विद्यापीठांनीही असे उपक्रम राबवण्याची आवश्यकता आहे.
– डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, (अध्यक्ष: नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी वैयक्तिकृत शिक्षण आराखडा समिती )
*उपक्रमाची वैशिष्ट्ये*
– २६ जूलै २०२३ रोजी या उपक्रमाला सुरूवात, ७० हून अधिक गावांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम पूर्ण
– एनईपी घरोघरी या उपक्रमातून थेट ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती उपलब्ध
– ग्रामपंचायतीत होणाऱ्या कार्यक्रमात सदस्य आणि गावकरी यांचा मोठा सहभाग
– महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये एनईपीसाठी प्रभावी जाणीवजागृती
फोटो ओळी
सोलापूर: एनईपी घरोघरी या उपक्रमाच्या वाहनासमवेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत.