शैक्षणिक घडामोडी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी आम्ही तयार आहोत असा संदेश जनमाणसात पोहचवावा.. प्राचार्य डॉ. अशोक सपाटे

माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी सप्ताहाच्या समारोपप्रसंगी बोलताना प्राचार्य अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, सतिश शेळके, महेश मोटे व अन्य.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी आम्ही तयार आहोत असा संदेश जनमाणसात पोहचवावा.. प्राचार्य डॉ. अशोक सपाटे

HTML img Tag Simply Easy Learning    

मुरुम, ता. उमरगा, (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० चे अंमलबजावणीच्या प्रचार-प्रसाराच्या सप्ताह ता. २४ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध विषयांवर विषय तज्ञांची व्याख्याने संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रक, रांगोळी काढून नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रचार-प्रसार केला. शहरातून पदयात्रा वाढण्यात येऊन या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी (ता. १) रोजी या साप्ताहाच्या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. सतिश शेळके, एनईपीचे जिल्हा सदस्य प्रा. डॉ. महेश मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य सपाटे बोलताना म्हणाले की, अश्या उपक्रमातून नवीन शैक्षणिक धोरणाची जनजागृती होण्यास मदत होईल. आपण सर्वजण यासाठी तयार आहोत असा संदेश जनमानसात पोहचवावा असे मत डॉ. सपाटे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी एनईपीचे सदस्य डॉ. महेश मोटे यांनी आठवडाभराच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. शैक्षणिक धोरण समजून घेण्यास अश्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. यावेळी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा उत्साह वाढवला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी केले. सूत्रसंचालन एनईपीचे समन्वयक डॉ. सुजित मठकरी तर आभार डॉ. सुशील मठपती यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थिती होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी सप्ताहाच्या समारोपप्रसंगी बोलताना प्राचार्य अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, सतिश शेळके, महेश मोटे व अन्य.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button