प्रेरणादायक

लिंगायत समाजातील बसव कन्या लिंगायत शरणी जिने समस्त लिंगायत समाजाचे नाव पुन्हा एकदा  जगात पोहोचवले – अपूर्वा अलाटकर चालवतेय पुण्याची मेट्रो

अपूर्वा अलाटकरचे त्याच बरोबर तिचे आई वडील  की ज्यांनी तीला बहुमोल मार्गदर्शन केलं त्यांचं मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

लिंगायत समाजातील बसव कन्या लिंगायत शरणी जिने समस्त लिंगायत समाजाचे नाव पुन्हा एकदा  जगात पोहोचवले – अपूर्वा अलाटकर चालवतेय पुण्याची मेट्रो

HTML img Tag Simply Easy Learning    

लिंगायत समाजातील बसव कन्या लिंगायत शरणी जिने समस्त लिंगायत समाजाचे नाव पुन्हा एकदा  जगात पोहोचवले आणि आम्ही ही काही कमी नाही हे दाखवून दिले  लिंगायत समाजातील आदर्श कित्तूर राणी चेन्नमा ,अक्कमहादेवी आणि वासोटा दुर्ग रक्षणी  ताई तेलीन यांचा आदर्श घेऊन आपल्या कराडच्या लेकिन मेट्रो चे सुकाणू आपल्या हातात घेतलं

HTML img Tag Simply Easy Learning    

* बसव कन्या लिंगायत शरणी अपूर्वा अलाटकर चालवतेय पुण्याची मेट्रो*
पुण्याच्या मेट्रो सेवेची सुरुवात मंगळवारी झाली. विशेष म्हणजे या मेट्रोची ट्रेन ऑपरेटर अपूर्वा अलाटकर ही मुलगी आहे. मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत याचे हे आणखी एक उदाहरण …
अपूर्वा अलाटकरने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१९ मध्ये मेट्रो साठीच्या विविध पदासाठी अर्ज केला होता. त्यानुसार तिने आपले स्थान पक्के केले. तिच्याकडे वनाज स्थानकाची स्टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी आहे.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला अन अपूर्वाने ‘मास्क ऑन की’ चा वापर करत मेट्रो मार्गस्थ केली. खरच तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच!
अपूर्वा अलाटकर ही आपले समाज बांधव  प्रमोद अलाटकर यांची मुलगी आहे.अलाटकर मूळचे येळगाव (ता.कराड) येथील आहेत.नोकरी निमित्ताने ते साताऱ्यात राहतात.
म्हणूनच म्हटलं’आपल्या कराडच्या लेकीचं अभिनंदन करूया!’
बसव कन्या लिंगायत शरणी अपूर्वा अलाटकरचे त्याच बरोबर तिचे आई वडील  की ज्यांनी तीला बहुमोल मार्गदर्शन केलं त्यांचं मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!💐💐💐💐💐💐💐
          

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button