श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय केंद्र संचालकपदी मयूर स्वामींची निवड
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी मयूर स्वामींचा स्वामींचे कृपावस्त्र प्रसाद देऊन सन्मान केला.

श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय केंद्र संचालकपदी मयूर स्वामींची निवड

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४/८/२३) – येथील युवा हार्मोनियम वादक मयूर
स्वामींची अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईच्या वतीने श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालयाच्या संचालक पदी निवड करण्यात आली. त्याप्रित्यर्थ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी मयूर स्वामींचा स्वामींचे कृपावस्त्र प्रसाद देऊन सन्मान केला. यावेळी बोलताना महेश इंगळे यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये मयूर स्वामी हे वेळोवेळी हार्मोनियम वादनाच्या माध्यमातून सेवा देत आहेत. स्वामी कृपेची छत्रछाया त्यांच्या डोक्यावर असल्याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई च्या वतीने अक्कलकोटच्या स्वामी समर्थ संगीत विद्यालयच्या केंद्र संचालक पदी त्यांची निवड स्वामी कृपेनेच झाली असल्याचे मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना इंगळे यांनी श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय अक्कलकोट येथील सर्वात जुने व एकमेव संगीत केंद्र आहे. या विद्यालयातून अनेक विध्यार्थी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. शास्त्रीय संगीताचे थोर उपासक संगीतालंकार कै.शरणप्पा कलबुर्गी हे या विद्यालयाचे संस्थापक व केंद्र संचालक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या पश्चात हे पद मयूर स्वामी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे असे सांगून मयूर स्वामी यांच्या पुढील वाटचालीस स्वामी समर्थांचे आशीर्वाद व आमच्या शुभेच्छा नेहमीच पाठीशी असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, चंद्रकांत डांगे, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – मयूर स्वामी यांचा सत्कार करताना महेश इंगळे, चंद्रकांत डांगे व अन्य दिसत आहेत.
