स्वामीकृपेने कै.कल्याणराव इंगळे महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल – प्रा.जेऊरे
कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचा चौदावा वर्धापन दिन उत्साहात साजरा

स्वामीकृपेने कै.कल्याणराव इंगळे महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल – प्रा.जेऊरे



कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचा चौदावा वर्धापन दिन उत्साहात साजरा


(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१०/८/२३) –
(शब्दकोश – श्रीशैल गवंडी) –
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या इतिहासातील तत्कालीन व सर्वकालीन धडाडीचे नेतृत्व असलेले चेअरमन कै. कल्याणराव इंगळे यांनी गेल्या १५ वर्षापूर्वी मोठी जिद्द बाळगून तालुक्यातील एकमेव तंत्रनिकेतन महाविद्यालयाची निर्मिती केली.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचा पदभार सांभाळत तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून आणण्यास मोलाचे योगदान दिले. या पार्श्वभूमीवर आज आपल्या तालुक्यात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून कैलासवासी कल्याणराव इंगळे यांनी उभारलेले तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे नावलौकिक संपूर्ण देशात आहे. त्यांच्या मौलिक मार्गदर्शनाच्या पार्श्वभूमीवर वाटचाल सुरू ठेवून महाविद्यालयाची वाटचाल पंधराव्या वर्षात यशस्वीपणे होत आहे, ही बाब तालुक्यातील नागरिकांसह तंत्र शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांनाही मोठे अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयास तंत्रशिक्षणास इच्छुक तळमळ असलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा वारसा लाभत आहे. विद्यार्थ्यांची तंत्रशिक्षणाप्रती असलेली जिद्द व महाविद्यालयातील स्वामी सेवाभावातून चालू असलेली व्यावसायिक शिक्षण प्रणाली यांचा संयुक्त संगम साधून श्री स्वामी समर्थांच्या कृपेने कै. कल्याणराव इंगळे महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन कै.कल्याणराव इंगळे महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे यांनी केले. आज येथील कै.कल्याणराव इंगळे महाविद्यालयाचा १४ वा वर्धापन दिन वृक्षारोपण, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, विद्यार्थी मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य नागनाथ जेऊरे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी देवस्थानचे विद्यमान चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, प्रा.नागनाथ जेऊरे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या व कै.कल्याणराव इंगळे यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करत आकाशात फुगे सोडून महाविद्यालय वर्धापन दिनाचा आनंद साजरा करण्यात आला. पुढे बोलताना प्राचार्य नागनाथ जेऊरे यांनी आपल्या महाविद्यालयाचे संस्थापक तत्कालीन चेअरमन कै.कल्याणराव इंगळे साहेबांनी देवस्थान व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्याच विद्यार्थी वसतिगृहातील मुलांना मोफत भोजनाचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल व देवस्थान अन्नदानाच्या माध्यमातून ही सेवा आजही अखंडपणे सुरू असल्याबद्दल साहेबांचे मनपुर्वक आभार मानले. महाविद्यालयाचे संस्थापक तत्कालीन चेअरमन कै.कल्याणराव इंगळे यांच्या कार्यपद्धतीची प्रेरणा घेत देवस्थानचे विद्यमान चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व विश्वस्त सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली व उच्चस्तरीय शिक्षण प्रणालीच्या अधिपत्याखाली तंत्रनिकेतनची घोडदौड सुरू आहे. याची दखल घेत या महाविद्यालयास एन.बी.ए. मानांकन प्राप्त झालेले आहे. यापुढेही तालुक्यातील तंत्रशिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या श्री स्वामी समर्थांच्या कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेऊन आपल्या तालुक्याचा व आपल्या महाविद्यालयाचा व विशेष करून श्री स्वामी समर्थांचे मूळ देवस्थानचा नावलौकिक वाढवावा असेही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, प्राचार्य एन.बी.जेऊरे सर, उपप्राचार्य विजयकुमार पवार सर, एसीओ अमोल भावठाणकर सर, विभागप्रमुख माने सर, विभागप्रमुख जनगोंडा सर, विभाग प्रमुख खिलारी सर व सर्व टिचींग व नाॅन टिचींग स्टाफ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन घुरघुरे सर यांनी केले तर, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिराळ मॅडम, पोतदार मॅडम, श्रृती पाटील मॅडम, ममनाबाद मॅडम, जहागिरदार मॅडम, सागर लोणारी सर आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ – कै.कल्याणराव इंगळे महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आकाशात फुगे सोडताना प्राचार्य नागनाथ जेऊरे व अन्य दिसत आहेत.