*ध्येय प्राप्तीसाठी जीवाचें रान करून यश संपादन करा – शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक*
श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शालेय विद्यार्थी मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न

*ध्येय प्राप्तीसाठी जीवाचें रान करून यश संपादन करा – शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक* श्रीक्षेत्र तीर्थ दिनांक १२ ऑगस्ट २०२३

श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शालेय विद्यार्थी मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
प्रारंभी ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुधीर सोनकोडे तर प्रमुख अतिथी परिचय श्री महेश पट्टणशेट्टी यांनी करून दिला.तसेच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी सरदेशपांडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थी जीवनात शुद्धलेखनाची सवय ठेवली तर त्याची विविध स्पर्धा परीक्षेत मदत होते. विद्यार्थ्यांनी वाचा,बोला आणि लिहा या मंत्राचा वापर केला पाहिजे. तुम्ही जे घडणार आहात किंवा बिघडणार आहात हे या वयापासून सुरुवात असते. शाळा आपल्याला घडवण्याचं काम करते. विद्यार्थी जीवनात शिस्त असायला हवी सकाळी उठणे, व्यायाम करणे,प्रामाणिक अभ्यास करणे.विद्यार्थी जीवनात वेळ मिळाल्यास व्यक्त व्हा,दडपण घेऊ नका मोबाईलचा वापर टाळा सध्याचे वय आकर्षणाचे आहे. काय चांगलं काय वाईट याचे भान ठेवावे व त्यास बळी पडू नये.


जन्म कोणत्या घरात व्हावं हे आपल्या हातात नाही. मेहनत व चांगले प्रयत्न गरजेचे आहे. जे काही करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर करा ,विद्यार्थ्यांनो मोबाईल अतिक्रमणापासून लांब राहा ध्येय प्राप्तीसाठी जीवाचे रान करून यश संपादन करा. असा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,मोठे होण्यासाठी मोठ्यांचे ऐकले पाहिजे, स्वतःला कमी लेखू नका,इच्छा असेल तर यश सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करायला कधीही मागे पडायचे नाही.चांगल्याला चांगले म्हणण्याचे धाडस विद्यार्थ्यांमध्ये असावे. भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचा निश्चय करुया असे मत यावेळी व्यक्त केले. त्याचबरोबर यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी पंचप्रण शपथ घेऊन भारताच्या उज्वल यशात आपणही सामील होऊन आत्मनिर्भर विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकारण्याचे शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव कोरे तर आभार महेश पट्टणशेट्टी यांनी मानले.यावेळी वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनिल सनगले, युवा नेता श्री महेश दादा बिराजदार,पोलीस पाटील सिद्धाराम वळसंगे, डेप्युटी सरपंच पैगंबर मुल्ला, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र जाधव,महादेव होटकर, रामलिंग उदंडे, निवृत्त ग्रामविकास अधिकारी शिवलिंगप्पा वंगे,कल्लप्पा म्हेत्रे, शिवराज बिराजदार, द्न्यानेश्वर विभुते , शाळेतील सर्व शिक्षक वृद,शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते
