डॉ.रामलिंग पुराणे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित…
सामाजिक कार्याची दखल घेऊन मला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाले जरी असले तरी हे पुरस्कार मी माझे आई-वडील,पत्नी, मार्गदर्शक, मित्र परिवार, मुरूम शहर व परिसरातील नागरिक,प्रसार माध्यमांना समर्पित करतो....सामाजिक कार्यात सात्यत ठेवण्यास प्रामाणिकपणे प्रयत्न चालू राहील... - डॉ.रामलिंग पुराणे, अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण
डॉ.रामलिंग पुराणे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित…
मुरूम ता.१३, उमरगा तालुक्यातील मुरूम येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष पत्रकार डॉ.रामलिंग काशिनाथ पुराणे यांना दि.१३ रोजी तेजस फाउंडेशन नाशिकच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव पत्र व सन्मानचिन्ह, एस आर बोदडे लिखित ज्ञानभूमी ते दीक्षाभूमी पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. दि.१३ रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख मान्यवर जिल्हा लोयर्स अध्यक्ष ऍड. एस आर बोदडे, लोकमत सखी मंच अध्यक्षा लक्ष्मीबाई सपकाळ, निर्मिक फाउंडेशन अध्यक्ष निशांत पवार,घाटी हॉस्पिटल सेवानिवृत्त सहायक अधिसेविका विजया खोले, अभिनेता लिंबाजी चव्हाण, प्राणी,पक्षी मित्र सचिन अवचरस,तेजस फाउंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री मेघा डोळस,साहित्यिक महेंद्र तुपे आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. पुराणे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ.पुराणे यांना यापूर्वी विविध सामाजिक संस्था, संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यातील मानद डॉक्टरेट पदवी, समाजरत्न,समाजचिंतक, कोरोना योद्धा यासह विविध पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे.
स्टेटमेंट
सामाजिक कार्याची दखल घेऊन मला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाले जरी असले तरी हे पुरस्कार मी माझे आई-वडील,पत्नी, मार्गदर्शक, मित्र परिवार, मुरूम शहर व परिसरातील नागरिक,प्रसार माध्यमांना समर्पित करतो….सामाजिक कार्यात सात्यत ठेवण्यास प्रामाणिकपणे प्रयत्न चालू राहील…
– डॉ.रामलिंग पुराणे, अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण